Video | रणबीर कपूर याचा संताप, अभिनेत्याचा ‘तो’ व्हिडीओ पाहून लोक हैराण, थेट मनी लाँड्रिंग प्रकरणात
बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा सध्या तूफान चर्चेत आहे. रणबीर कपूर याला थेट ईडीने समन्स पाठवलाय. रणबीर कपूर हा मोठ्या अडचणीत सापडल्याचे स्पष्ट दिसतंय. रणबीर कपूर याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. रणबीर कपूर याचा काही दिवसांपूर्वीच तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणबीर कपूर हा दिसला. रणबीर कपूर याच्या या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल.
विशेष म्हणजे पहिल्यांदा या चित्रपटाच्या माध्यमातून श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर हे एकसोबत स्क्रीन शेअर करताना दिसले. नुकताच रणबीर कपूर याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. रणबीर कपूर याला थेट ईडीने समन्स पाठवलाय. रणबीर कपूर याची ईडीकडून चाैकशी केली जाणार आहे.
रणबीर कपूर याला 6 ऑक्टोबर रोजी ईडीसमोर हजर व्हायरल होते. मात्र, रणबीर कपूर हा आज ईडी पुढे हजर झाला नाहीये. रणबीर कपूर याने ईडीला मेल करत पर्सनल कारण देत वेळ मागितलाय. रणबीर कपूर याचे नाव थेट महादेव गेमिंग अॅपमध्ये आलंय. यामुळे आता त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट दिसतंय. या प्रकरणात रणबीर कपूर याचे पाय खोलात असल्याचे देखील सांगितले जातंय.
View this post on Instagram
इतकेच नाही तर 15 ते 20 बाॅलिवूड कलाकारांचा देखील या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समावेश आहे. आता नुकताच रणबीर कपूर याचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. रणबीर कपूर याचा हा व्हिडीओ पाहून लोकांना मोठा धक्का बसल्याचे दिसतंय. रणबीर कपूर याच्यावर या व्हिडीओमुळे टिका देखील केली जातंय.
या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर हा पापाराझी यांच्यावर भडकताना दिसतोय. रणबीर कपूर हा नुकताच स्पाॅट झाला. यावेळी पापाराझी हे रणबीर कपूर याला आवाज देत होते. मात्र, पापाराझी यांच्याकडे दुर्लक्ष करून थेट पुढे निघून जाताना सुरूवातीला रणबीर कपूर दिसला. त्यानंतर थेट पापाराझी यांच्यावर भडकत रणबीर कपूर हा म्हणतो की, आतमध्ये येऊ नका. त्यानंतर रणबीर कपूर हा तिथून निघून जाताना देखील दिसतोय.