‘रंग’ सिनेमातील हिरोच्या मुलांसमोर फेल आहेत मोठमोठे स्टारकिड्स; पहा व्हिडीओ
'रंग' या चित्रपटातील अभिनेते कमल सदाना आठवतायत का? काही चित्रपटांनंतर ते इंडस्ट्रीपासून दूर गेले. मात्र बऱ्याच वर्षांनंतर त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि मुलगासुद्धा दिसले. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
!['रंग' सिनेमातील हिरोच्या मुलांसमोर फेल आहेत मोठमोठे स्टारकिड्स; पहा व्हिडीओ 'रंग' सिनेमातील हिरोच्या मुलांसमोर फेल आहेत मोठमोठे स्टारकिड्स; पहा व्हिडीओ](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/11/kamal-sadanah.jpg?w=1280)
मुंबई : 13 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री काजोलने जेव्हा फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं, तेव्हा तिच्या पहिल्यावहिल्या चित्रपटातील हिरो होते अभिनेते कमल सदाना. आपल्या साध्या लूकमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली विशेष छाप सोडली होती. त्यानंतर कमल सदाना यांनी आणखी काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्यापैकी काही चित्रपट हिट ठरले आणि काहींमधील गाणी आजही लोकप्रिय आहेत. काही चित्रपटांनंतर कमल सदाना हे फिल्म इंडस्ट्री आणि कॅमेरापासून दूर गेले. आता बऱ्याच वर्षांनंतर कमल सदाना यांच्या मुलाने आणि मुलीने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. वडिलांसोबत हे दोघं नुकतेच एका कार्यक्रमात हजर होते.
या कार्यक्रमानिमित्त कमल सदाना हे बऱ्याच काळानंतर कॅमेरासमोर आले. यावेळी त्यांच्यासोबत मुलगी लिया सदाना आणि मुलगा अंगद सदाना उपस्थित होते. वडिलांसोबत दोघांनी फोटोसाठी एकत्र पोझ दिले. त्याचाच व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. कमल यांची मुलगी तर सुंदर आहेच, पण त्यांचा मुलगासुद्धा हँडसम असल्याचं अनेकांनी म्हटलंय. ‘मुलगा हा कमल यांचीच कार्बन कॉपी आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘वडील सुंदर आहेत, म्हणूनच मुलगा आणि मुलगी पण सुंदर आहेत’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
एकेकाळी मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलेले कमल सदाना बऱ्याच काळापासून अभिनयविश्वापासून दूर आहेत. मात्र ते फिल्म प्रॉडक्शनमध्ये काम करत असल्याचं कळतंय. कमल सदाना हे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक ब्रिज सदाना यांचे पुत्र आहेत. ब्रिज सदाना यांनी स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली होती. त्यावेळी कमल फक्त वीस वर्षांचे होते. कमल यांनी रंग, बाली उमर को सलाम यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.