Rani Mukerji हिच्यावर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे आरोप; अभिनेत्रीच्या प्रेमात ‘या’ अभिनेत्याने ओलांडली मर्यादा

आज आनंदाने वैवाहिक आयुष्य जगत असलेल्या अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्यावर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे आरोप... एक दोन नाही तर इतक्या अभिनेत्यांसोबत राणीचे प्रेमसंबंध

Rani Mukerji हिच्यावर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे आरोप; अभिनेत्रीच्या प्रेमात 'या' अभिनेत्याने ओलांडली मर्यादा
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 2:41 PM

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी हिने बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष राज्य केलं. एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये फक्त आणि फक्त राणीच्या नावाची चर्चा असायची. एवढंच नाही तर, राणीसोबत काम करण्यासाठी अनेक दिग्दर्शक, निर्माते अभिनेते रांगेत असायचे. राणीने महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून अनेक नव्या अभिनेत्यांसोबत देखील काम केलं आहे. राणी कायम तिच्या अभिनेयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहिली. पण राणीच्या नावाची तुफान चर्चा रंगली जेव्हा राणीने २०१४ साली गुपचूप लग्न केलं. पण लग्नाआधी देखील राखीचं अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आलं.

ज्या अभिनेत्यांचं नाव राणीसोबत जोडण्याच आलं त्यामधील काही अभिनेते विवाहित होते. ज्यामुळे राणी हिच्यावर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे आरोप करण्यात आले. आज राणीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेवू. ज्यामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली.

अभिनेता गोविंदा : राणी मुखर्जी आणि गोविंदा यांची ओळख २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘हद कर दी आपने’ सिनेमाच्या सेटवर झाली. राणी आणि गोविंदा यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. तेव्हाच त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. पण गोविंदा तेव्हा विवाहित होता. दोघांच्या अफेअरची गोष्ट अभिनेत्याच्या घरी कळाल्यानंतर गोविंदाची पत्नी सुनीता यांना मोठा धक्का बसला. पण अखेर गोविंदाने प्रेम विसरून कुटुंबाला सर्वात जास्त महत्त्व दिलं. राणीच्या आईला देखील गोविंदासोबत लेकीचं असलेलं नातं मान्य नव्हतं.

हे सुद्धा वाचा

अभिनेता आमिर खान : राणी आणि आमिर यांची पहिली भेट 1998 साली प्रदर्शित झालेल्या ‘विक्रम भट्ट’ सिनेमा दरम्यान झाली. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. रिल लाईफ प्रमाणे त्यांची रियल लाईफमधील केमिस्ट्री देखील चाहत्यांना आवडू लागली. जेव्हा दोघांच्या नात्याची चर्चा रंगू लागली, तेव्हा आमिर आणि पहिली पत्नी रीना यांच्यातील वाद देखील समोर आले. एवढंच नाहीतर, आमिर माझा क्रश असल्याचा राणीने कार्यक्रमात स्वीकार केला.

अभिनेता अभिषेक बच्चन : अभिषेक बच्चन आणि राणी यांच्या नावाच्या देखील तुफान चर्चा रंगल्या. दोघांचा साखरपुडा झाल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला. दोघांच्या नात्याला अभिनेत्री जया बच्चन यांचा देखील होकार होता. पण अभिषेक याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केला. आज अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.

आदित्य चोप्रा : आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांच्या अफेअरच्या चर्चांनी देखील जोर धरला. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्यने लहानपणीची मैत्रिण पायलसोबत लग्न देखील केलं होतं. पण आदित्यच्या आयुष्यात राखीची एन्ट्री झाली आणि आदित्यचे पत्नीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर काही वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता राणी आदित्यसोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.

पहिली पत्नी पायल हिला घटस्फोट दिल्यानंतर आदित्यने अनेक वर्ष अभिनेत्री राणी मुखर्जीला डेट केलं. त्यानंतर २१ एप्रिल २०१४ मध्ये दोघांनी गुपचूप लग्न केलं. आदित्य आणि राणी यांना एक मुलगी देखील आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.