सलमान खानची मुलगी… राणी मुखर्जीच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर चाहते हैराण

एका मुलाखतीत खुद्द सलमान खान याने केलं होतं स्वतःच्या मुलांवर प्रेम व्यक्त... अखेर भाईजानच्या लेकीबद्दल राणी मुखर्जी हिचं मोठं वक्तव्य... सर्वांसमोर राणी असं काय म्हणाली, ज्यांमुळे चाहते देखील झाले हैराण.... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राणी - सलमान यांची चर्चा...

सलमान खानची मुलगी...  राणी मुखर्जीच्या 'त्या' वक्तव्यानंतर चाहते हैराण
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 3:10 PM

मुंबई | 15 मार्च 2024 : आज 90 च्या दशकातील अनेक सेलिब्रिटींनी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करत संसार थाटला आहे. आज त्यांची मुलं देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या मार्गावर आहेत. पण अभिनेता सलमान खान वयाच्या 58 व्या वर्षी देखील एकटाच आहे. पण एकदा सलमान खान याने त्याची पत्नी आणि मुलांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. एवढंच नाहीतर, एका शोमध्ये राणी मुखर्जी हिने सलमान खान याच्या मुलीबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.

राणी मुखर्जी अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत सलमान खान याच्या ‘दस का दम’ शोमध्ये पोहोचली होती. तेव्हा राणी विनोदी अंदाजात म्हणाली, ‘मला असं वाटतं सलमान खान याला एक मुलगी व्हायला पाहिजे. म्हणजे शाहरुख – सलमान यांची मैत्री नात्यात बदलेल… अबराम याच्यासोबत सलमानच्या मुलीचं लग्न होऊ शकतं…’

राणीच्या वक्तव्यावर किंग खान म्हणाला, ‘ही राणी मुखर्जी नाहीतर, शादी मुबारक आहे…’ तेव्हा राणी तुफान चर्चेत आली होती. सलमान खान याला लहान मुलं प्रचंड आवडतात. एकदा खुद्द सलमान खान त्याची पत्नी आणि मुलांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.

हे सुद्धा वाचा

सलमान म्हणाला होता, ‘मला लहान मुलांवर प्रचंड प्रेम आहे. मी बाप होण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण आपल्या देशात सरोगेसीचे कायदे बदलण्यात आले आहेत. जेव्हा मुलं येतात तेव्हा त्यांची आई देखील येते आणि माझ्या मुलांची खरी देखील माझी पत्नी असेल…’ सलमान आज 58 वर्षांचा आहे. आज देखील चाहते अभिनेत्याला लग्नाबद्दल विचारत असतात.

अभिनेता सलमान खान याने आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सलमान फक्त अभिनेता नाहीतर, भाईजान कायम गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी धावत असतो. सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आज देखील बॉलिवूडमध्ये सलमानचं असलेलं स्थान अन्य अभिनेता घेऊ शकलेला नाही.

वृद्ध व्यक्तींपासून लहान मुलांपर्यंत सर्वांमध्ये सलमान खान याची क्रेझ आहे. सोशल मीडियावर देखील सलमानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. चाहते कायम सलमान खान याच्या आगामी सिनमांच्या प्रतीक्षेत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.