Baby Planning | रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या घरी हलणार पाळणा, अत्यंत मोठा खुलासा
रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. रणवीर सिंह हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे.
मुंबई : रणवीर सिंह हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. रणवीर सिंह (Ranveer Singh) याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र, रणवीर सिंह याच्या या चित्रपटांना काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंह याचा सर्कस हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही विशेष धमाका करण्यात यश मिळाले नाही. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणवीर सिंह आणि चित्रपटाची संपूर्ण टिम दिसली.
काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांचा राॅकी आैर रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने धमाका केला. राॅकी आैर रानी की प्रेम कहानी चित्रपटाने चांगली कमाई केल्याने रणवीर सिंह याला मोठा दिलासा मिळाला. एका मागून एक रणवीर सिंह याचे चित्रपट फ्लाॅप जात होते.
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे कायमच चर्चेत असणारे कपल आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण ही पठाण चित्रपटात धमाका करताना दिसली. विशेष म्हणजे या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे ब्रेक केले.
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे नुकताच कॉफी विथ करण या शोमध्ये पोहचले. या शोचा एक प्रोमो व्हायरल होताना दिसतोय. या प्रोमोमध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे दिसत आहेत. यावेळी आपल्या पर्सनल लाईफबद्दल मोठे खुलासे करताना रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे दिसत आहेत.
यावेळी करण जोहर हा रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांना बेबी प्लॅनिंगबद्दल विचारताना दिसतोय. पहिल्यांदाच यावर जाहिरपणे भाष्य करताना रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे दिसले आहेत. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी थेट खुलासा करत म्हटले की, लवकरच आम्ही बेबी प्लॅनिंग करू शकतो. यांचे हे बोलणे ऐकून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळतंय.