रणवीर-दीपिकाने प्रभादेवीतील अपार्टमेंट दिलं भाडेतत्त्वावर; एका महिन्याचं भाडं ऐकून व्हाल चकीत!

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी प्रभादेवी परिसरातील अपार्टमेंट भाड्याने दिलं आहे. तीन वर्षांसाठी हा करार झाला असून एका महिन्यासाठी लाखो रुपयांचं भाडं स्वीकारण्यात आलं आहे. या अपार्टमेंटमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत.

रणवीर-दीपिकाने प्रभादेवीतील अपार्टमेंट दिलं भाडेतत्त्वावर; एका महिन्याचं भाडं ऐकून व्हाल चकीत!
Deepika Padukone and Ranveer Singh Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 10:59 AM

नुकतंच आई-बाबा बनलेल्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी मुंबईतील प्रभादेवी इथलं अपार्टमेंट भाडेतत्त्वावर दिलं आहे. प्रभादेवीमधील ‘ब्यू मोंडे टॉवर्स सहकारी गृहनिर्माण संस्था लि.’मध्ये रणवीर-दीपिकाचं आलिशान घर आहे. पश्चिम आणि मध्य उपनगरं तसंच वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वरळी-वांद्रे सी लिंक यांसारख्या प्रमुख रस्त्यांना जोडणारा हा परिसर आहे. ‘स्क्वेअर यार्ड्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर-दीपिकाच्या या अपार्टमेंटचा बिल्ट-अप एरिया 3,245 चौरस फूट असून कारपेट एरिया हा 2,319.50 इतका चौरस फूट आहे. यामध्ये तीन कारसाठी पार्किंगची जागादेखील समाविष्ट आहे. या महिन्यात या अपार्टमेंटचा लीज करार पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आला आहे.

रणवीर-दीपिकाने दरमहा 7 लाख रुपये भाडेतत्त्वावर हे अपार्टमेंट दिलं आहे. यासाठी 21 लाख रुपयांची सेक्युरिटी डिपॉझिट घेण्यात आली आहे. पहिल्या 18 महिन्यांसाठी याचं भाडं प्रतिमहा 7 लाख रुपये असेल. त्यानंतर उर्वरित 18 महिन्यांसाठी ते भाडं वाढवून 7.35 लाख रुपये करण्यात येईल. हे अपार्टमेंट सुसज्ज असून त्यात जिम, स्विमिंग पूल आणि अत्याधुनिक सुरक्षा प्रणालींचाही समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

याच ब्यू मोंडे टॉवर्समध्ये दीपिकाचं आणखी एक अपार्टमेंट आहे. या टॉवरमध्ये 2,3,4 आणि 5 बीएचके अपार्टमेंट्स आहेत. प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरासाराख्या इतरही अनेक प्रतिष्ठित स्थळं या परिसरात आहेत. हा परिसर दादर बीच आणि फिनिक्स मॉलच्या जवळ आहे. याशिवाय मुंबईतील वांद्र्यातही रणवीर-दीपिकाचा प्रीमिअम अपार्टमेंट आहे. त्याचप्रमाणे अलिबागमध्येही 2.25 एकर परिसरात पसरलेला त्यांचा बंगला आहे. 2022 मध्ये तिने अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याजवळ तब्बल 119 कोटी रुपयांचा ‘फोअर-प्लेक्स’ खरेदी केला आहे. फोअर-प्लेक्स म्हणजेच चार स्वतंत्र अपार्टमेंट्स असलेली निवासी इमारत. या प्रत्येक अपार्टमेंटचं प्रवेशद्वार वेगवेगळं असतं.

दीपिका पादुकोणने 8 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या मुलीचं नाव ‘दुआ’ असं ठेवलं आहे. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी 2018 मध्ये लग्न केलं. दीपिकाला मुलगी होताच रणवीरची मोठी इच्छा पूर्ण झाली असं म्हटलं जातंय. रणवीरने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत ही खास इच्छा बोलून दाखवली होती. त्याला मुलगी हवी होती आणि अखेर त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. मुलीच्या जन्मानंतर रणवीर आणि दीपिकाने इन्स्टाग्रामवर ‘बेबी गर्लचं स्वागत’ अशी पोस्ट लिहित त्याखाली जन्मतारखेचा उल्लेख केला होता. या पोस्टवर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

Non Stop LIVE Update
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्...
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्....
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य.
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क.
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल.
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात.
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क.
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?.
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?.
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.