Karan Deol Wedding | नातवाच्या वरातीत धर्मेंद्र यांचा जबरदस्त डान्स; बॉबी देओलनेही धरला ठेका, पहा व्हिडीओ

करण आणि दृशा लहानपणापासून एकमेकांना ओळखतात आणि दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. हे दोघं गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दृशा ही फॅशन डिझायनर असून करणप्रमाणेच तीसुद्धा चित्रपटसृष्टीशी संबंधित कुटुंबातून आहे.

Karan Deol Wedding | नातवाच्या वरातीत धर्मेंद्र यांचा जबरदस्त डान्स; बॉबी देओलनेही धरला ठेका, पहा व्हिडीओ
Dharmendra, Karan DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 2:20 PM

मुंबई : अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देओल कुटुंबात लग्नाची धूम पहायला मिळतेय. आता करणच्या वरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीच्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून करण देओलचे आजोबा धर्मेंद्र आहेत. नातवाच्या लग्नाच्या दिवशी त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही, हे या व्हिडीओत स्पष्ट पहायला मिळतंय. डोक्यावर पगडी बांधून धर्मेंद्र वरातीत धमाल डान्स करताना दिसत आहेत.

आज (18 जून) करण देओल लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या वरातील देओल कुटुंबीयांनी जबरदस्त डान्स केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत धर्मेंद्र यांच्यासोबतच अभिनेता बॉबी देओलसुद्धा पगडी बांधून नाचताना दिसत आहे. धर्मेंद्र यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट पहायला मिळतोय. या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. 16 जूनपासून करणच्या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. संगीत कार्यक्रमात सनी देओलने ‘गदर’ या चित्रपटातील गाण्यावर धमाकेदार डान्स केला होता. तर बॉबी देओलने पत्नीसोबत रोमँटिक डान्स सादर केला होता.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

करण आणि त्याची गर्लफ्रेंड दृशा आचार्य गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आज हे नातं पती-पत्नीमध्ये रुपांतरित होणार आहे. करण आणि दृशा लहानपणापासून एकमेकांना ओळखतात आणि दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. हे दोघं गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दृशा ही फॅशन डिझायनर असून करणप्रमाणेच तीसुद्धा चित्रपटसृष्टीशी संबंधित कुटुंबातून आहे. तिचे पणजोबा बिमल रॉय हे महान भारतीय चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानले जातात. बिमल रॉय यांचे चित्रपट वास्तववादी आणि समाजवादी विषयांसाठी ओळखले जायचे. दो बिघा जमीन, परिणीता, देवदास, मधुमती, सुजाता, पारख आणि बंदिनी यांसारख्या चित्रपटांचा त्यात समावेश आहे.

करणने ‘यमला पगला दिवाना 2’ या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्याने 2019 मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता तो ‘अपने के अपने 2’ या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंद्रसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.