आंटी तुम्ही बाहेर येऊन बिग बॉस खेळू नका; अंकिताच्या सासूवर भडकली रश्मी देसाई

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर दिलेल्या मुलाखतींमध्ये विकीच्या आईने अंकितावर बरीच टीका केली होती. अंकिता सहानुभूती मिळवण्यासाठी सतत सुशांत सिंह राजपूतचं नाव घेत असल्याचं त्यांनी म्हटलं. इतकंच नव्हे तर अंकिता-विकीच्या लग्नाला आमचा पाठिंबा कधीच नव्हता, असाही खुलासा त्यांनी केला होता.

आंटी तुम्ही बाहेर येऊन बिग बॉस खेळू नका; अंकिताच्या सासूवर भडकली रश्मी देसाई
Rashami Desai and Ankita LokhandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 8:20 AM

मुंबई : 11 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही जोडी यंदाच्या सिझनमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. या जोडीबाबत बिग बॉसच्या माजी स्पर्धकांकडून आणि सेलिब्रिटींकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच अंकिताची खास मैत्रीण आणि टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाईने आता मौन सोडलं आहे. विकी जैनची आई आणि अंकिताची सासू रंजना जैन यांनी तिला बरंच काही सुनावल्यानंतर रश्मी अंकिताच्या बाजूने उभी राहिली आहे. रश्मीने अंकिता आणि विकीसाठी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने विकीच्या आईलाही सुनावलं आहे. बिग बॉसच्या घराबाहेर खेळ खेळू नका, असा थेट सल्ला तिने अंकिताच्या सासूला दिला आहे. बिग बॉसच्या फॅमिली वीकदरम्यान विकीची आई घरात त्यांना भेटायला गेली होती. त्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी विविध मुलाखती दिल्या. या मुलाखतींमध्ये त्या अंकितावर टीका करताना दिसल्या आहेत.

अंकितासोबतचा जुना फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट करत रश्मीने लिहिलं, ‘तू जशी आहेस तशीच राहा. मला तू तशीच आवडतेस. आजवर तू अनेक बदलांना सामोरं गेलीस आणि ते फक्त तुझ्यासाठीच नव्हतं. तुझ्या प्रेमाचं योगदान आणि ज्या व्यक्तीवर तू प्रेम करतेस ती व्यक्तीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तू तुझ्या मेहनतीने सर्व कमावलंस आणि बेधडक स्वभावामुळे तू आज अंकिता लोखंडे बनली आहेस,’ या पोस्टमध्ये रश्मीने पुढे विकीच्या आईला सुनावलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘..आणि मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करते. तुला या सर्वांची गरज नाही. पण खूप प्रेमाने तू हे सर्व स्वीकारलंस. हा शो काही दिवसांनी संपेल आणि हा शो म्हणजे फक्त अंकिताबद्दल नाही हे कुटुंबीयांना लवकरच समजेल अशी आशा आहे. हा शो अंकिता आणि विकी या दोघांबद्दल आहे. दोघंही सर्व गोष्टी सांभाळण्या इतपत समजूतदार आहेत. मला माहितीये आंटी, तुम्हाला कदाचित वाईट वाटू शकतं, पण ते दोघं माझे चांगले मित्र आहेत. बिग बॉस या शोचे ते दोघं स्पर्धक आहेत. त्यामुळे तुम्ही बाहेर येऊन बिग बॉस खेळू नका. जिंदगी अभी बाकी है मेरे दोस्त’, अशा शब्दांत तिने विकी जैनच्या आईला सुनावलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.