Rashmika Mandanna: रश्मिका-विजयचं मालदीवमध्ये रोमँटिक व्हेकेशन?
रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाचं मालदीव व्हेकेशन? डेटिंगची चर्चा ठरतेय खरी
मुंबई- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दोन लोकप्रिय कलाकार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा अनेकदा झाल्या. आता पुन्हा एकदा या दोघांच्या रिलेशनशिपबाबत जोरदार चर्चा होऊ लागली आहे. कारण नुकतंच या दोघांना मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. आधी विजय आणि त्याच्या काही मिनिटांच्या अंतरानंतर रश्मिका ही विमानतळावर दिसली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार हे दोघं मालदीवमध्ये (Maldives) सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जात असल्याचं कळतंय. त्यामुळे हे दोघं खरंच एकमेकांना डेट करत आहेत का, असा प्रश्न पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात डोकावला आहे.
विजय आणि रश्मिकाने ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. या दोन्ही चित्रपटातील ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. तेव्हापासूनच या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र वारंवार या दोघांनी डेटिंगच्या चर्चा नाकारल्या आहेत.
View this post on Instagram
कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये विजयला रश्मिकाबद्दल प्रश्न विचारला असता ती फक्त चांगली मैत्रीण असल्याचं त्याने म्हटलं. तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिकानेही विजय फक्त मित्र असल्याचं म्हटलंय. त्यामुळे या दोघांना विमानतळावर पाहिल्यानंतर चाहत्यांना त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल प्रश्न पडला आहे.
डेटिंगच्या चर्चांवर रश्मिकाचं उत्तर-
“करिअरच्या सुरुवातीच्या काळात विजय आणि मी एकत्र काही चित्रपटात काम केलं होतं. इंडस्ट्री कशी आहे हेसुद्धा आम्हाला त्यावेळी माहीत नव्हतं. अशा वेळी जेव्हा तुम्ही एकाच विचाराच्या लोकांसोबत काम करता, तेव्हा तुम्ही आपोआप चांगले मित्र बनता. आमच्या दोघांचे कॉमन फ्रेंड्ससुद्धा खूप आहेत. त्यामुळे आमच्याबद्दल अशा चर्चा होत असतील तर ते मला क्यूट वाटतं”, असं रश्मिका म्हणाली होती.
विजय देवरकोंडाचं उत्तर-
“आम्ही करिअरच्या सुरुवातीला एकत्र दोन चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ती स्वभावाने खूप चांगली आहे आणि आम्ही फक्त चांगले मित्र आहोत”, असं विजयने ‘कॉफी विथ करण’मध्ये स्पष्ट केलं होतं.