Rashmika Mandanna | रश्मिका मंदाना – विजय देवरकोंडाचं ब्रेकअप? अभिनेत्रीच्या व्हिडीओवरून चर्चांना उधाण

विजयने ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर रश्मिकानेसुद्धा ‘गुडबाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. मात्र या दोघांचे चित्रपट फ्लॉप ठरले. रश्मिकाने सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटातही भूमिका साकारली आहे.

Rashmika Mandanna | रश्मिका मंदाना - विजय देवरकोंडाचं ब्रेकअप? अभिनेत्रीच्या व्हिडीओवरून चर्चांना उधाण
Rashmika Mandanna and Vijay DeverakondaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 9:38 AM

हैदराबाद : नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाशी तिचं नाव नेहमी जोडलं जातं. हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत, इतकंच नव्हे तर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत, अशाही चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर विजय किंवा रश्मिकाने कधीच थेट नकार दिला नाही. मात्र आता रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे तिचा हृदयभंग झाल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहेत. विजयसोबत ब्रेकअप झालं की काय, असा सवाल चाहते तिला करत आहेत.

रश्मिकाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केलेला हा एक मोटिव्हेशनल व्हिडीओ आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती त्याच्या समोर बसलेल्या तरुणीला आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण शिकवण देताना दिसतोय. तो म्हणतोय, “कधी कधी काही गोष्टी यासाठी बिघडतात, जेणेकरून तुमच्या आयुष्यात त्यापेक्षा चांगलं काहीतरी येऊ शकेल. कधी कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला गमावता कारण त्यापेक्षा उत्तम व्यक्ती तुम्हाला मिळू शकते, हे तुम्हाला समजावं. कधी कधी तुम्हाला सर्वांत कठीण मार्गावर चालावं लागतं जेणेकरून तुम्ही आयुष्यातील सर्वांत सुंदर ठिकाणी पोहोचू शकाल.”

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओत ती व्यक्ती पुढे म्हणते, “मला माहितीये की ये कठीण आहे पण तुम्ही समजू शकत नाही की एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून का निघून गेली? जोपर्यंत तुम्ही हे खरंच पाहू शकत नाही की तुमच्या आयुष्यासाठी हेच सर्वोत्तम होतं. तुमची आताची ही परिस्थिती कायम नसेल. हे वादळ आणि दु:ख निघून जाईल आणि त्यातून तुम्ही उत्तम व्यक्ती म्हणून बाहेर पडाल.” रश्मिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे आणि त्यातील संदेशामुळे नेटकऱ्यांनी विजयसोबत तिचा ब्रेकअप झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.

विजयने ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर रश्मिकानेसुद्धा ‘गुडबाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. मात्र या दोघांचे चित्रपट फ्लॉप ठरले. रश्मिकाने सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटातही भूमिका साकारली आहे. ती लवकरच ‘ॲनिमल’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय तिच्या ‘पुष्पा : द रूल’ या चित्रपटाचीही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.