विजय देवरकोंडासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतेय रश्मिका? व्हायरल व्हिडीओवर अखेर सोडलं मौन

काही दिवसांपूर्वी रश्मिका आणि विजय एकत्र मालदीवला फिरायला गेले होते, अशीही चर्चा होती. मुंबई एअरपोर्टवर दोघांना पाहिलं गेलं होतं. रश्मिकाच्या पाठोपाठ थोड्या वेळानंतर विजय मुंबई एअरपोर्टवर पोहोचला होता.

विजय देवरकोंडासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतेय रश्मिका? व्हायरल व्हिडीओवर अखेर सोडलं मौन
Rashmika Mandanna and Vijay DeverakondaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 1:50 PM

मुंबई : नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे बरीच चर्चेत असते. ‘अर्जुन रेड्डी’ फेम अभिनेता विजय देवरकोंडाशी तिचं नेहमीच नाव जोडलं जातं. मात्र या दोघांनी त्यावर कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती. रश्मिकाने गुरूवारी तिच्या वाढदिवशी चाहत्यांसाठी खास व्हिडीओ शेअर केला होता. मात्र या व्हिडीओमधील बॅकग्राऊंडकडे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं. कारण त्याच बॅकग्राऊंडमध्ये विजयचे अनेक फोटो सोशल मीडियावर आहेत. इतकंच नव्हे तर रश्मिकाच्या हातात ती अंगठी होती, ती विजयची आवडती अंगठी आहे असं म्हटलं जातंय. त्यामुळे हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा दावा केला जात आहे.

रश्मिकाने या चर्चांवर अखेर प्रतिक्रिया दिली आहे. विजय देवरकोंडासोबत ती लिव्ह-इनमध्ये राहतेय की नाही याचं उत्तर तिने दिलं आहे. ‘रश्मिका आणि विजय हे एकमेकांना डेट करत असल्याचं सिद्ध झालंय. विजयची आवडती अंगठी रश्मिकाच्या हातात आहे आणि दोघं एकाच घरात राहत आहेत’, असं वृत्त ट्विटरवर शेअर करण्यात आलं होतं. त्यावर रश्मिकाने प्रतिक्रिया देत लिहिलं आहे, ‘अय्यो… बाबू जास्त विचार करू नका.’ यासोबतच तिने हसण्याचा आणि हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे.

हे सुद्धा वाचा

डिअर कॉम्रेड आणि गीता गोविंदम या चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर ही जोडी लोकप्रिय झाली. मात्र खऱ्या आयुष्यातही या दोघांमध्ये काहीतरी नक्कीच शिजतंय, अशी शंका चाहत्यांना आहे. रश्मिका आणि विजय या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत करिअरची सुरुवात केली असली तरी बॉलिवूडमध्ये त्यांचा फॅन फॉलोईंग मोठा आहे.

विजयने ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर रश्मिकानेसुद्धा ‘गुडबाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. मात्र या दोघांचे चित्रपट फ्लॉप ठरले. रश्मिकाने सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटातही भूमिका साकारली आहे. ती लवकरच ‘ॲनिमल’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय तिच्या ‘पुष्पा : द रूल’ या चित्रपटाचीही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

काही दिवसांपूर्वी रश्मिका आणि विजय एकत्र मालदीवला फिरायला गेले होते, अशीही चर्चा होती. मुंबई एअरपोर्टवर दोघांना पाहिलं गेलं होतं. रश्मिकाच्या पाठोपाठ थोड्या वेळानंतर विजय मुंबई एअरपोर्टवर पोहोचला होता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.