Rashmika Mandanna | ‘देवाने त्याला सवडीने बनवलं…’, ‘त्या’ खास व्यक्तीबद्दल रश्मिकाने अखेर सोडलं मौन

रश्मिका मंदाना हिच्या आयुष्यातील 'तो' खास कोण आहे? ज्याचं कौतुक करत अभिनेत्री म्हणते, 'देवाने त्याला सवडीने बनवलं...', सध्या सर्वत्र रश्मिका हिची चर्चा...

Rashmika Mandanna | 'देवाने त्याला सवडीने बनवलं...', 'त्या' खास व्यक्तीबद्दल रश्मिकाने अखेर सोडलं मौन
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 12:02 PM

मुंबई | अभिनेत्री रश्मिका मंदाना गेल्या काही दिवसांपासून फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली आहे. दाक्षिणात्य सिनेविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने आपला मोर्चा बॉलिवूडच्या दिशेने वळवला. बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्रीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. रश्मिका तिच्या सिनेमांमुळेच नाही, अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत असते. पण दोघांनी देखील अद्याप त्यांच्या नात्याचा स्वीकार केलेला नाही. विजय देवरकोंडा याच्यासोबत रश्मिकाच्या नावाची चर्चा सुरु असताना अभिनेत्रीने एका बॉलिवूड अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. शिवाय देवाने त्याला सवडीने बनवलं आहे.. असं देखील रश्मिका म्हणाली आहे…

सध्या सर्वत्र रश्मिका हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टची चर्चा रंगत आहे. विजय देवरकोंडा नाही तर कोणत्या अभिनेत्याचं कौतुक रश्मिका करत आहे असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. रश्मिका ज्या अभिनेत्याचं कौतुक करत आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आहे.

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना लवकरच ‘एनिमल’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या आगामी सिनेमाची चर्चा सुरु आहे. नुकताच एक पोस्ट शेअर करत अभिनेत्री सिनेमाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. सिनेमाची शुटिंग पूर्ण झाल्यामुळे अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

सिनेमाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘अचानक माझ्याकडे एनिमल सिनेमा आला.. एनिमल सिनेमासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. सिनेमासाठी मी जवळपास ५० दिवस शूट केलं. आता काही तरी मागे राहिलं आहे असं वाटत आहे. सिनेमाची पूर्ण टीम प्रचंड प्रेमळ आहे. मी एनिमल सिनेमाच्या टीमसोबत १००० वेळा देखील काम करण्यासाठी तयार आहे..’

पुढे रश्मिका रणबीर कपूर याच्याबद्दल म्हणाली, ‘रणबीर याच्यासोबत स्क्रिन शेअर करणार म्हणून माझ्या मनावर थोडं दडपण होतं. देवाने खरंच त्याला सवडीने बनवलं आहे. तो एक चांगला अभिनेता तर आहेच, पण एक उत्तम माणूस देखील आहे… असं देखील अभिनेत्री म्हणाली.

रणबीर आणि रश्मिका यांच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘एनिमल’ सिनेमाची कथा गँगस्टरच्या आयु्ष्याभोवती फिरताना दिसत आहे. ११ ऑगस्ट रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी केलं आहे. आता चाहते रणबीर आणि रश्मिका यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.