OMG 2 | अक्षय कुमारवर थुंकणाऱ्याला 10 लाख रुपये देणार; ‘ओह माय गॉड 2’ पाहिल्यानंतर कोणी केली घोषणा?

राष्ट्रीय हिंदू परिषदने गुरुवारी अक्षय कुमारचा पुतळा आणि चित्रपटाचे पोस्टर जाळले. तर काही ठिकाणी थिटएरबाहेरही निदर्शनं केली. 'OMG 2' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

OMG 2 | अक्षय कुमारवर थुंकणाऱ्याला 10 लाख रुपये देणार; 'ओह माय गॉड 2' पाहिल्यानंतर कोणी केली घोषणा?
OMG 2Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 11:12 AM

मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : अभिनेता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट बऱ्याच वादानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटासोबत त्याची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. ‘गदर 2’ची बरीच क्रेझ असूनही ‘OMG 2’ला चांगला प्रतिसाद मिळतोय. मात्र या चित्रपटावरून सुरू झालेला वाद अद्याप शमलेला नाही. चित्रपटातील काही सीन्सवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. आता अक्षय कुमारबद्दल हिंदू संघटनेनं धक्कादायक घोषणा केली आहे. उत्तरप्रदेशच्या आग्रामधील राष्ट्रीय हिंदू परिषद भारत या संघटनेनं चित्रपटातील भूमिका आणि कथा यावरून नाराजी व्यक्त केली आहे. अमित राय दिग्दर्शित ‘OMG 2’ या चित्रपटात सेक्स एज्युकेशनचा मुद्दा मांडण्यात आला आहे. त्यावरच त्यांनी आक्षेप घेतला आहे.

‘ओह माय गॉड 2’मध्ये अक्षय कुमारने भगवान शंकराच्या दूताची भूमिका साकारली आहे. त्यामुळे चित्रपटाचा विषय पाहता ही भूमिका काहींच्या भावना दुखावणारी आहे, असा आरोप हिंदू संघटनेनं केला आहे. इतकंच नव्हे तर अक्षय कुमारच्या कानाखाली वाजवणाऱ्याला आणि त्याच्यावर थुंकणाऱ्याला 10 लाख रुपये बक्षिस देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. हिंदू संघटनेचे अध्यक्ष गोविंद पराशर यांनी ही घोषणा केल्याचं कळतंय.

राष्ट्रीय हिंदू परिषदने गुरुवारी अक्षय कुमारचा पुतळा आणि चित्रपटाचे पोस्टर जाळले. तर काही ठिकाणी थिटएरबाहेरही निदर्शनं केली. ‘OMG 2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘अक्षयने चित्रपटात भोलेनाथच्या दूताची भूमिका साकारली आहे, पण त्याला चप्पल घालून उभा असल्याचं, रस्त्यावर कचोरी खाताना आणि घाणेरड्या तलावात अंघोळ करताना दाखवलं गेलं आहे. अक्षयने जाहीरपणे देवाचा अपमान केला आहे’, असा आरोप त्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

वृंदावनच्या साध्वी ऋतंभरा यांनीसुद्धा बॉलिवूड चित्रपटांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. “बॉलिवूडमध्ये सतत हिंदू देवी-देवतांवरून चित्रपट बनवले जात आहेत. ही हिंदू धर्माची उदारता आहे, ज्यामुळे त्यांना असं करण्याची मुभा मिळतेय. पण हीच लोकं हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मावर कमेंट करायलाही घाबरतात. याआधीही हिंदू देवदेवतांचा अपमान केलाग गेला. आमच्या आस्थेची खिल्ली उडवू नये”, असं त्यांनी म्हटलंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.