Raveena Tandon | अनेक वर्षांनंतर रवीनाचा खासगी व्हिडीओ समोर; चाहते म्हणाले, ‘अशी असते…’

२००४ मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या रवीनाचा एक 'खासगी' व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल; व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल... सर्वत्र रवीनाच्या व्हिडीओची चर्चा..

Raveena Tandon | अनेक वर्षांनंतर रवीनाचा खासगी व्हिडीओ समोर; चाहते म्हणाले, 'अशी असते...'
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 9:58 AM

मुंबई | लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा.. त्यामुळे स्वतःच्या लग्नसोहळ्यात सुंदर दिसावं अशी प्रत्येक नवरीची इच्छा असते. त्यामुळे विविध प्रकारच्या मेकअपचा वापर करण्यात येतो. मुली त्यांच्या लग्नात सेलिब्रिटींना फॉलो करतात आणि त्यांच्याप्रमाणे स्वतःच्या लग्नात मेकअप करतात. पण अभिनेत्री रवीना टंडन हिने स्वतःच्या लग्नात अगदी साधा मेकअप केला होता. एक काळ बॉलिवूड गाजवणाऱ्या रवीनाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी होती. फक्त चाहतेच नाही तर अनेक सिलेब्रिटी देखील अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा होते. अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीने स्क्रिन देखील शेअर केली. पण यशाच्या उच्च शिखरावर असताना अभिनेत्रीने फिल्म डिस्ट्रिब्यूटर अनिल थडानी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीच्या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अनिल आणि रवीना यांचा विवाह देखील शाही पद्धतीत झाला. अनिल आणि रवीना यांचा विवाह उदयपूरच्या जग मंदिर पॅलेसमध्ये सिंधी आणि पंजाबी पद्धतीत झाला. रिपोर्ट्सनुसार, रवीना टंडन १०० वर्ष जुन्या शाही डोलीत बसून लग्नासाठी मंडपात आली होती. इंस्टाग्रामवर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रवीना लाल आणि सोनेरी रंगाच्या लेहेंग्यात नववधूच्या रुपात प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लग्नाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

स्वतःच्या लग्नात अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. लाल रंगाच्या लेहेंग्यात रवीना तर ऑफ व्हाइट रंगाच्या शेरवानीमध्ये अनिल थडानी उठून दिसत होते. रवीनाला नवरीच्या रुपात पाहून चाहते व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. लग्नातील अभिनेत्रीच्या साध्या लूककडे पाहून चाहते ‘अशी नवरी असते…’ कमेंट करत आहेत. सध्या सर्वत्र रवीनाच्या लग्नाच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.

फेब्रुवारी २००४ मध्ये रवीना टंडन आणि अनिल थडानी यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेवाडची राणी ज्या डोलीत बसायची त्या डोलीत रवीना नवरी म्हणून मंडपात आली होती. शिवाय स्वतःच्या लग्नात अभिनेत्री आईच्या लग्नातील लेहेंगा घातला होता. जो दिल्लीतील एका डिझायनरने तयार केला होता.

लग्नानंतर अभिनेत्री फार कमी सिनेमांमध्ये दिसू लागली. शिवाय कुटुंबासोबत रवीना अधिक व्यस्त झाली. सध्या रवीना तिच्या आगामी वेब सीरिजमुळे तुफान चर्चेत आहे. ‘आरण्यक’ सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.