Raveena Tandon | पतीसोबत कधी अक्षयसोबतच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा झाली का? रवीना म्हणाली..

90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या होत्या, ज्या चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यापैकी काही जोड्यांनी लग्नापर्यंतचा प्रवास केला, तर काहींचं नातं संपुष्टात आलं. अशीच एक जोडी अभिनेता अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची आहे.

Raveena Tandon | पतीसोबत कधी अक्षयसोबतच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा झाली का? रवीना म्हणाली..
Raveena Tandon and Akshay Kumar Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 9:54 AM

मुंबई | 28 सप्टेंबर 2023 : नव्वदच्या दशकात अभिनेता अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. जितकी चर्चा त्यांच्या रिलेशनशिपची झाली, त्यापेक्षा अधिक त्यांच्या ब्रेकअपचीही झाली. अक्षय आणि रवीनाने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 1995 पासून दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. इतकंच नव्हे तर त्यावेळी अक्षय आणि रवीनाच्या साखरपुडाच्याही चर्चा होत्या. मात्र नात्यातील काही समस्यांमुळे हा साखरपुडा मोडला आणि त्यानंतर दोघं कधीच एकमेकांसमोर आले नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीनाला अक्षयसोबतच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

नात्यातील फसवणुकीबद्दल काय म्हणाली?

‘लेहरें रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने सांगितलं की तिने ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट अक्षयसोबत साइन केला आहे. यानंतर तिला अक्षयसोबतच्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रवीनाने मात्र उत्तर न देणंच पसंत केलं. “मी त्याबद्दल काहीच चर्चा करू इच्छित नाही”, असं ती थेट मुलाखतकर्त्याला म्हणाली. त्यापुढे जेव्हा तिला नात्यातील फसवणुकीबद्दल विचारलं गेलं. तेव्हा ती म्हणाली, “फक्त रोमँटिक नातंच नव्हे तर प्रत्येक नातं हे विश्वास, प्रेम, प्रामाणिकपणा यांवर अवलंबून असतं. हा नियम आयुष्यातील प्रत्येक प्रकारच्या नात्यांसाठी लागू असतो.”

पतीसोबत भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल चर्चा?

अक्षयसोबत साखरपुडा मोडल्यानंतर रवीनाने अनिल थडानीसोबत लग्न केलं. पतीसोबत कधी भूतकाळाच्या रिलेशनशिपवर चर्चा केली का, असाही प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “आम्ही लग्नापूर्वी एकमेकांना फारसे ओळखायचो नाही. अनिललाही त्याच्या खासगी गोष्टींबद्दल फारशी चर्चा केलेली आवडत नाही आणि माझ्याबाबतही तसंच आहे.”

हे सुद्धा वाचा

एका व्हॅलेंटाइन डे पार्टीमध्ये रवीना आणि अनिल थडानी यांची पहिली भेट झाली होती. त्या पार्टीच्या दोन वर्षांनंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. 4 ऑगस्ट 2003 रोजी दोघं भेटले आणि एकमेकांशी बोलू लागले. त्यानंतर फेब्रुवारी 2004 मध्ये रवीना आणि अनिलने लग्न केलं. अनिल हा रवीनाच्या ‘पत्थर के फूल’ या चित्रपटाचा डिस्ट्रिब्युटरसुद्धा होता. मात्र ही गोष्ट रवीनाला त्यावेळी माहीत नव्हती.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.