AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raveena Tandon हिने ‘या’ वयात कुटुंबाला दिली ‘गुडन्यूज’, पतीचा आनंद गगनात मावेना

रवीना टंडन हिने वयाच्या ४८ व्या वर्षी चाहत्यांसह पती आणि कुटुंबियांना दिली आनंदाची बातमी; त्यानंतर अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव... सध्या सर्वत्र रवीनाचीच चर्चा...

Raveena Tandon हिने 'या' वयात कुटुंबाला दिली 'गुडन्यूज', पतीचा आनंद गगनात मावेना
| Updated on: Mar 26, 2023 | 10:10 AM
Share

मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) हिने स्वतःची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं आहे. एक काळ रुपेरी पडदा गाजवणारी रवीना आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. मोठ्या पडद्यावर अभिनय आणि सौंदर्याची जादू दाखवल्यानंतर अभिनेत्रीने अनेक चाहत्यांच्या मनात राज्य केलं. ९० चं दशक गाजवणाऱ्या रवीनाची जादू आजही चाहत्यांच्या मनातून कमी झालेली नाही. आज रवीना फार कमी सिनेमांमध्ये झळकत असली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. शिवाय केजीएफ सिनेमाच्या दुसऱ्या भागात देखील रवीनाने अभिनय करत चाहत्यांकडून दाद मिळवली. वयाच्या ४८ व्या वर्षी देखील रवीना प्रचंड ग्लॅमरस आणि हॉट दिसते.

दरम्यान, वयाच्या ४८ वर्षी अभिनेत्रीने कुटुंबियांना आनंदाची बातमी दिली आहे. रवीनाने गुडन्यूज दिल्यानंतर पतीचा आनंद देखील गगनात मावेनासा होता. तर या वयात रवीनाने पती आणि कुटुंबाला असा कोणता आनंद दिला, ज्याची चर्चा सध्या सर्वत्र तुफान रंगत आहे. वयाच्या ४८ वर्षी कुटुंबात आनंद पसरवत असणाऱ्या रवीनावर कुटुंबिय आणि चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

रवीना आणि तिच्या कुटुंबासाठी २०२३ हे वर्ष प्रचंड खास असणार आहे. सुपरहीट केजीएफ सिनेमात झळकल्यानंतर अभिनेत्री केजीएफ सिनेमाच्या तिसऱ्या भागात देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. शिवाय नुकताच रवीना वडिलांच्या पुण्यतिथीसाठी बनारस याठिकाणा पोहोचली होती. तेव्हाचे देखील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

याचदरम्यान रवीना म्हणाली होती, २०२३ हे वर्ष अभिनेत्रीसाठी प्रचंड खास असणार आहे. अभिनेत्रीला सरकारकडून विशेष पुरस्कार देखील मिळाला आहे. रवीना टंडनला 2023 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पद्मश्री पुरस्कार फार कमी लोकांना प्रदाण करण्यात येतो. पुरस्कार जाहिर झाल्यानंतर सर्वांनी रवीनाचं कौतुक करण्यास सुरुवात केली.

पत्नीला पद्मश्री पुरस्काराने सन्मातीन केल्यामुळे पती आनंद थडाणी यांचा आनंद गगनाता मावेनासा होता. सध्या सर्वत्र रवीना आणि तित्या कामगिरीची चर्चा आहे. ९० च्या दशकात असलेली रवीनाची जादू आजही कमी झालेली नाही. सध्या सर्वत्र रवीनाची चर्चा रंगत आहे.

रवीना आज तिच्या खासगी आयुष्या प्रचंड आनंदी आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अनेक सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं. रावीना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अशात चाहते रवीनाच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.