रवीनाने मोडला मैत्रिणीचा संसार, ‘या’ प्रसिद्धी सेलिब्रिटींना देखील अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात

Raveena Tandon Love Life: मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत रवीनाने थाटला संसार, पण त्याआधी 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटींना अडवलं प्रेमाच्या जाळ्यात, एका अभिनेत्याचं नाव जाणून व्हाल हैराण... रवीना टंडन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

रवीनाने मोडला मैत्रिणीचा संसार,  'या' प्रसिद्धी सेलिब्रिटींना देखील अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 3:45 PM

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचं नाव अनेक अविवाहित सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. विवाहित सेलिब्रिटींच्या प्रेमात पडून अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांना दुसऱ्या पत्नीचा दर्जा मिळाला. आज याच अभिनेत्री पती आणि मुलांसोबत आनंदी आणि रॉयल आयुष्य जगत आहेत. अशाच अभिनेत्रींमध्ये रवीना टंडन देखील आहे. रवीना, अनिल थडानी यांची दुसरी पत्नी आहे.

रवीनाने देखील विवाहित सेलिब्रिटीसोबत लग्न केलं आहे. जेव्हा रवीना – अनिल यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगत होत्या, तेव्हा अनिल थडानी विवाहित होते. महत्त्वाचं म्हणजे रवीना हिच्यासोबत लग्न करण्यासाठी अनिल यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. आज पती अनिल थडानी यांच्यासोबत रवीना रॉयल आयुष्य जगत आहे.

रवीना आणि अनिल यांची पहिली पत्नी चांगल्या मैत्रिणी देखील होत्या… अशी देखील चर्चा रंगली होती. एवढंच नाही तर, अनिल यांच्यासोबत लग्न करण्याआधी रवीनाने अनेक सेलिब्रिटींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. त्याच सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊ.

हे सुद्धा वाचा

अभिनेता सलमान खान याच्यासोबत देखील रवीनाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘पत्थर’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरलं होतं. असं देखील सांगण्यात आलं. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पत्थर’ सिनेमातून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

अभिनेता अजय देवगन याच्यासोबत देखील रवीनाचं नाव चर्चेच होता. दोघांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा फक्त बॉलिवूड नाही तर, चाहत्यांमध्ये देखील तुफान रंगल्या. पण दोघांच्या नात्याचा अंत फार वाईट होता… असं देखील सांगण्यात आलं.

अभिनेता अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या नात्याच्या चर्चा तर आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

एक वेळ अशी देखील होती, जेव्हा रवीना हिच्या नावाची चर्चा अभिनेता सनी देओल याच्यासोबत रंगली होती. दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी देखील सर्वत्र जोर धरला. पण दोघांनी देखील नात्यावर कधी अधिकृत घोषणा केली नाही. आता दोघे त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. अभिनेता संजय दत्त याच्यासोबत देखील रवीनाच्या प्रेमसंबंधांच्या चर्चा रंगल्या होत्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.