कोट्यवधींचा गंडा घातल्याप्रकरणी प्रसिद्ध निर्मात्याला अटक, दुसऱ्या लग्नमुळे झाला होता ट्रोल

एक दोन नाहीतर प्रसिद्ध निर्मात्याने केली इतक्या कोटींची फसवणूक... पोलिसांनी निर्मात्याला केली अटक... चेन्नई येथील पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरण नक्की काय? ...

कोट्यवधींचा गंडा घातल्याप्रकरणी प्रसिद्ध निर्मात्याला अटक, दुसऱ्या लग्नमुळे झाला होता ट्रोल
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 9:07 AM

मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | कोट्यवधींचा गंडा घातल्याप्रकरणी प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शकला अटक करण्यात आली आहे. कोट्यवधींचा गंडा घातल्या प्रकरणी ज्या निर्मात्याला अटक करण्यात आले आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून रविंदर चंद्रशेखरन आहे. जो दुसऱ्या लग्नामुळे तुफान चर्चेत आला होता. शिवाय सोशल मीडियावर रविंदर चंद्रशेखरन याला ट्रोल देखील करण्यात आलं होतं. आता रविंदर चंद्रशेखरन मोठ्या संकटात अडकला आहे. सेंट्रल क्राईम ब्रांचने (CCB) निर्मात्याला १६ कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी अटक केली आहे. रविंदर चंद्रशेखरन याच्या विरोधात चेन्नई येथील पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्यामुळे सर्वत्र रविंदर चंद्रशेखरन याची चर्चा सुरु आहे.

ऑक्टोबर २०२० मध्ये लिब्रा प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या ३९ वर्षीय रविंदर चंद्रशेखरन याने ‘मादव मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’च्या बालाजी कापा यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला होता. संबंधीत प्रस्ताव नगर पालिकेच्या घनकचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर करायचा होता… यासाठी रविंदर चंद्रशेखरन याने बालाजी कापाकडून आर्थिक मदत घेतली होती.

१७ सप्टेंबर २०२० मध्ये एक गुंतवणूक करार केला आणि रविंदर चंद्रशेखरन याला १५.८३ कोटो रुपये देण्यात आले. पण व्यवसाय सुरु केल्यानंतर रविंदर चंद्रशेखरन याने बालाजी कापा कंपनीचे पैसे परत केले नाहीत. रविंदर चंद्रशेखरन याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे. सध्या याप्रकरणी पोलीस अधिक करत आहेत.

रविंदर चंद्रशेखरन याच्याबद्दल सांगायचं झालं तर निर्मात्याने अभिनेत्री महालक्ष्मी शंकर हिच्यासोबत दुसरं लग्न केलं.. दुसऱ्या लग्नामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सोशल मीडियावर देखील निर्मात्याला ट्रोल करण्यात आलं होतं. निर्मात्याचं पहिलं लग्न आर. शांती हिच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं लग्न अधिक काळ टिकलं नाही. अखेर निर्मात्याने महालक्ष्मी शंकर हिच्यासोबत दुसरं लग्न केलं..

मीडियारिपोर्टनुसार महालक्ष्मी आणि रविंद्र ओळख यांची ओळख ‘विदियुम वरई काथिरु’ या सिनेमात झाली. सिनेमाच्या सेटवरच दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतरप प्रेमात झालं. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री फक्त पैशांसाठी निर्मात्यासोबत लग्न केलं अशी देखील चर्चा रंगली होती.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.