National Awards 2023 Winners LIVE | 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांच्या नावाची संपूर्ण यादी, बाॅलिवूडवर साऊथ भारी
नुकताच 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करण्यात आलीये. या पुरस्कार यादीत अनेक चित्रपटांनी बाजी मारली आहे. साऊथच्या चित्रपटांचा देखील जलवा हा बघायला मिळाला आहे. बाॅलिवूड चित्रपटांवर नक्कीच साऊथचे चित्रपट भारी पडल्याचे या विजेत्यांच्या यादीतून दिसत आहे.
मुंबई : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Awards 2023) घोषणा आज दिल्लीतून केली गेलीये. या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत होती. शेवटी आता विजेत्यांच्या नावाची घोषणा ही करण्यात आलीये. देशातील सर्व पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार हा सर्वात मोठा मानला जातो. यामुळे प्रत्येक अभिनेता आणि निर्मात्याचे स्वप्न असते हा पुरस्कार (Awards) मिळण्याचे. विशेष म्हणजे बाॅलिवूड चित्रपटांना मोठी टक्कर देताना प्रादेशिक चित्रपट दिसले आहेत. विशेष: साऊथ चित्रपटांचा जलवा हा बघायला मिळाला आहे. खाली संपूर्ण विजेत्यांच्या नावाची यादी वाचा…
राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी द काश्मीर फाइल्स, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – RRR, सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म रॉकट्री: द नंबी इफेक्ट, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा / आरआरआर, सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट – गंगुबाई काठियावाडी, सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर – सरदार उधम सिंह, सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर – सरदार उधम सिंह, सर्वोत्कृष्ट संपादन गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट छायांकन – सरदार उधम सिंह, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी द काश्मीर फाइल्स, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (मिमी), सर्वोत्कृष्ट बालकलाकार – भाविन रबारी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), क्रिती सॅनन (मिमी), सर्वोत्कृष्ट अभिनेता – अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी – द होली वॉटर)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – सरदार उधम सिंह, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – एकदा काय झालं, सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – छेल्लो शो, सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – 777 चार्ली, सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट – समांतर, सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट – होम याप्रमाणे चित्रपटांना पुरस्कार मिळाले आहेत.
या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये पुष्पा, सरदार उधम सिंह, RRR, द काश्मीर फाइल्स, गंगुबाई काठियावाडी या चित्रपटांचा प्रामुख्याने जलवा हा बघायला मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट हिच्यासोबत कंगना राणावत हिला मिळणार असल्याची एक जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगताना दिसली होती.
परंतू सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी कंगना राणावत हिच्याऐवजी मिमी चित्रपटासाठी क्रिती सॅनन हिला पुरस्कार मिळाला आहे. कंगना राणावत हिचा पत्ता अचानक कट झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का हा बसला आहे. पल्लवी जोशी हिला देखील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटाचा जलवा या पुरस्कारांमध्ये बघायला मिळत आहे.