Rekha : हेमा मालिनी यांच्या बर्थडे पार्टीत रेखा यांचा ‘क्या खूब लगती हो’ गाण्यावर खास डान्स

बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. त्यापैकीच एक म्हणजे एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा.

Rekha : हेमा मालिनी यांच्या बर्थडे पार्टीत रेखा यांचा 'क्या खूब लगती हो' गाण्यावर खास डान्स
Hema Malini and RekhaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 5:33 PM

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमधील सुवर्णकाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 70 आणि 80 च्या दशकात अशा अनेक अभिनेत्री आल्या, ज्यांनी सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली. अशाच दोन अभिनेत्री नुकतेच एका मंचावर एकमेकांसमोर आले. या दोन अभिनेत्री म्हणजे ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी आणि ‘एव्हरग्रीन’ रेखा. आपल्या अप्रतिम सौंदर्य, नृत्यकौशल्य आणि दमदार अभिनयासाठी या दोघी अभिनेत्री ओळखल्या जातात. हे दोघं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून पुढे आल्या आणि आजही त्यांच्याही मैत्री कायम आहे. याची प्रचिती नुकत्याच झालेल्या एका पार्टीत पहायला मिळाली. हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.

या पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रेखा आणि हेमा मालिनी हे मंचावर उभे आहेत. यावेळी रेखा यांनी हेमा यांच्यावर प्रेमाचा खूप वर्षाव केला. त्यांना मिठी मारली आणि प्रेमाने त्यांच्या गालाचं चुंबनही घेतलं. ‘क्या खूब लगती हो’ या गाण्यावर रेखा यांनी डान्ससुद्धा केला. एकाच फ्रेममध्ये या दोन दिग्गज कलाकारांना इतक्या प्रेमळ अंदाजात पाहून चाहतेसुद्धा भारावले.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

हेमा आणि रेखा यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या दोघी अजूनही अनेकांसाठी ड्रीम गर्ल आहेत, असं एका युजरने लिहिलं. तर ‘मद्रासच्या दोन महिलांनी बी-टाऊनमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘दोघींनी आजही आपली मैत्री खूप चांगली जपली आहे’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

रेखा यांनी या बर्थडे पार्टीत क्रीम कलरची हेव्ही सीक्वेन्सची साडी नेसली होती. यावेळी त्यांचा लूक लक्षवेधी ठरला. हेमा मालिनी यांच्या बर्थडे पार्टीला जया बच्चन, माधुरी दीक्षित, जुही चावला, राणी मुखर्जी, पद्मिनी कोल्हापुरे यांसारख्या कलाकारांचीही उपस्थिती पहायला मिळाली. हेमा मालिनी यांचे पती धर्मेंद्रसुद्धा या वाढदिवसाला हजर होते. त्यांनी आपल्या हाताने हेमा मालिनी यांना केक भरवला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.