Rekha | ब्रेकअपच्या बऱ्याच वर्षांनंतर रेखाबद्दल किरण कुमार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..

रेखा यांच्या चित्रपटांसोबतच त्यांचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत होतं. बॉलिवूडमधल्या बऱ्याच सेलिब्रिटींसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं होतं. त्यापैकीच एक नाव म्हणजे किरण कुमार. किरण कुमार आणि रेखा हे 1970 च्या दशकात एकमेकांना डेट करत होते. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही.

Rekha | ब्रेकअपच्या बऱ्याच वर्षांनंतर रेखाबद्दल किरण कुमार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Rekha and Kiran KumarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 9:15 AM

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडच्या ‘एव्हरग्रीन’ अभिनेत्री रेखा यांचं बऱ्याच अभिनेत्यांसोबत नाव जोडलं गेलं होतं. त्यापैकीच एक नाव म्हणजे किरण कुमार. 1970 च्या दशकात रेखा आणि किरण कुमार यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नव्हतं. किरण कुमार यांनी पुन्हा रेखा यांच्यासोबत पॅचअप करण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते रेखाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले आहेत. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “वैयक्तिकदृष्ट्या फक्त रेखाचा माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव होता असं मी म्हणणार नाही. पण माझ्या आयुष्यात ज्या कोणी महिला आल्या, त्या प्रत्येकीने मला पुढे जाण्यात खूप मदत केली.”

‘मम्माज बॉय’ कमेंटवर प्रतिक्रिया

1995 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रेखा यांनी किरण यांना ‘मम्माज बॉय’ असं म्हटलं होतं. याविषयी किरण यांची प्रतिक्रिया विचारली असता ते पुढे म्हणाले, “रेखाजी खूप प्रेमळ आहेत. त्यांचं हृदय सोन्याचं आहे आणि चेहरा सौंदर्यवतीचा आहे. इतक्या वर्षांनंतर आजही त्या इतक्या सुंदर कशा दिसू शकतात हा मला प्रश्न पडतो. ती एक अशी व्यक्ती आहे, जिच्यासाठी माझ्या मनात खूप आदर आहे. बऱ्याच काळापासून आमची भेट झाली नाही. पण त्या व्यक्तीला मी माझ्या हृदयात कायम जपून ठेवीन. बस, इतकंच.”

रेखा यांच्याविषयी काय म्हणाले?

रेखा यांनी एक व्यक्ती म्हणून विकसित होण्यास कशी मदत केली असा प्रश्न किरण यांना या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं, “माझा विकास करण्यास कोणीही मदत केली नाही. मी स्वत:च माझ्या प्रगतीसाठी जबाबदार आहे. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक महिलेनं मला एक व्यकी म्हणून घडण्यास मदत केली. फक्त एका विशेष व्यक्तीचं मी नाव घेऊ शकत नाही. कारण त्या सर्वांनीच माझी मदत केली. माझं यश हे माझंच आहे आणि माझं अपयशसुद्धा माझं स्वत:चं आहे. त्याचं श्रेय मी कोणाला देणार नाही.”

हे सुद्धा वाचा

“रेखाचं हृदय सोन्याचं”

या मुलाखतीत किरण यांनी हेसुद्धा सांगितलं की जर त्यांना संधी मिळाली तर ते रेखा यांच्याशी नक्कीच संवाद साधतील. “मला त्यांना संपर्क करायचा नाही. मी त्यांना फोन करून हे सांगू इच्छित नाही की, मॅडम मला तुम्हाला भेटायचं आहे. मी असं करू शकत नाही. कारण त्यांचं स्वत: एक आयुष्य आहे आणि माझंही आहे. जर नशिबात असेल तर आम्ही भेटू आणि तेव्हा मित्रांप्रमाणे गप्पा मारू. त्यांचं हृदय सोन्याचं आहे.”

1975 मध्ये ‘स्टारडस्ट’ या मासिकेला दिलेल्या एका मुलाखतीत रेखा यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दलही किरण यांना प्रश्न विचारला गेला. रेखा फोनवर बोलताना किरण यांच्या एक्स-गर्लफ्रेंडची नक्कल करून दाखवायच्या आणि त्यामुळे ते खूप चिडायचे, असं त्यात म्हटलं गेलं होतं. याविषयी बोलताना किरण म्हणाले, “असं काहीच झालं नव्हतं. ती खूप मोठी व्यक्ती आहे. ती असं का करेल? ती कोणाचंच अपमान करणार नाही. रेखा यांनी असं कधीच केलं नाही आणि भविष्यातही करणार नाही. ती एक्स गर्लफ्रेंड कोण होती, हेसुद्धा मला माहीत नाही.”

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.