टॉपलेस फोटोशूटमुळे ठरली ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’, ड्रग्जच्या केसनं संपवलं करिअर; अभिनेत्री आता बनली साध्वी
1993 मध्ये तिने स्टारडस्ट या मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या बोल्ड फोटोशूटमुळे ती 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणून ओळखली जाऊ लागली. यानंतर तिला 15 हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यावेळी या मासिकाच्या प्रती ‘काळा बाजार’ करून विकल्या गेल्या.
मुंबई : अभिनेत्री दिव्या भारतीच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीत एक पोकळी निर्माण झाली होती. त्यावेळी बऱ्याच अभिनेत्रींनी ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला. सौंदर्याचा विचार केला तर दिव्याशी बरोबरी करणाऱ्या अभिनेत्री इंडस्ट्रीत फार कमी होत्या. त्यातही नंतर अभिनेत्री ममता कुलकर्णी बॉलिवूडमध्ये चर्चेत आली. मात्र चित्रपटांपेक्षा ममता तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत होती. ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर एका गुन्हेगारी प्रकरणामुळे अवघ्या काही वर्षांत तिचं करिअर संपुष्टात आलं होतं.
ममता कुलकर्णीने 1992 मध्ये ‘तिरंगा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. नंतर ‘आशिक आवारा’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली. क्रांतीवीर, करण अर्जुन आणि सबसे बडा खिलाडी यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे तिला लोकप्रियता मिळू लागली. 1993 मध्ये तिने स्टारडस्ट या मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या बोल्ड फोटोशूटमुळे ती ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ म्हणून ओळखली जाऊ लागली. यानंतर तिला 15 हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यावेळी या मासिकाच्या प्रती ‘काळा बाजार’ करून विकल्या गेल्या. इतकंच नव्हे तर या वादाच्या काही वर्षांनंतर ममताने पुन्हा एकदा बोल्ड फोटोशूट केलं होतं.
View this post on Instagram
2013 मध्ये ममताने विकी गोस्वामीशी लग्न केलं. ड्रग्जच्या दुनियेत विकी गोस्वामी हे नाव खूप मोठं होतं. 2016 मध्ये 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटमध्ये सहआरोपी म्हणून तिचं नाव समोर आल होतं. या रॅकेटचा मास्टरमाइंड विकी होता. 2017 मध्ये पोलिसांनी तिच्या मुंबईतील घरी जाऊन तिला ‘गुन्हेगार’ घोषित केलं होतं. मात्र ममताने तिच्या विरोधातील सर्व आरोप फेटाळले होते.
2016 मध्ये ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामीला केनिया विमानतळावर अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. पण नंतर त्यांना सोडण्यात आलं होतं. असं म्हटलं जातं की, तिला चित्रपटात काम मिळावं म्हणून अंडरवर्ल्डमधून फोन यायचे.
2010 च्या मध्यात ममताने ‘योगिनी’ बनल्याचं घोषित केलं होतं. तिने तिच्या आयुष्यावर आधारित आत्मचरित्रसुद्धा लिहिलं होतं. 2003 मध्ये तिने ‘शेष बोंगसोधर’ या बांगलादेशी चित्रपटात शेवटचं काम केलं होतं. तर 2002 मध्ये ‘कभी तुम कभी हम’ हा तिचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट ठरला. आता गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ती चित्रपटसृष्टीत सक्रिय नाही.