Singer Alfaaz: ढाब्यावर वादानंतर प्रसिद्ध पंजाबी गायकावर असा झाला जीवघेणा हल्ला

'ज्याने कोणी हा प्लॅन बनवला, त्याला मी सोडणार नाही,' हनी सिंगचा इशारा

Singer Alfaaz: ढाब्यावर वादानंतर प्रसिद्ध पंजाबी गायकावर असा झाला जीवघेणा हल्ला
गायक अल्फाजवर जीवघेणा हल्ला; टेम्पो ट्रकने मारली धडक Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 1:20 PM

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moose Wala) हत्येनंतर आता आणखी एका पंजाबी गायकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी रात्री एका टेम्पो ट्रकने गायक अल्फाजला (Alfaaz) जोरदार धडक दिली. या अपघातात अल्फाजच्या शरीरावर अनेक दुखापती झाल्या आहेत. अल्फाज सध्या मोहालीच्या (Mohali) फोर्टीज रुग्णालयात दाखल आहे. गायक हनी सिंगने त्याचा रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र काही वेळानंतर त्याने ही पोस्ट डिलिट केली. तोपर्यंत अल्फाजला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एका ढाब्याबाहेर ही घटना घडली होती.

या टेम्पो ट्रकने अल्फाजला धडक दिली, ती गाडी ढाब्याचा माजी कर्मचारी चालवत होता. ढाब्याच्या मालकासोबत पैशांवरून काही वाद झाल्याने तो तावातावाने मालकाचा टेम्पो ट्रक घेऊन तिथून निघाला. आरोपीचं नाव विकी असून तो मूळचा रायपूर रानी इथला राहणारा आहे. विकीला रविवारी पोलिसांनी अटक केली.

या अपघातात अल्फाजच्या डोक्याला, हातांना आणि पायांना दुखापत झाली. मात्र आता त्याच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. रविवारी अल्फाजने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की तो तेजी, कुलजित आणि गुरप्रीत या मित्रांसोबत ढाब्यावर रात्री जेवायला गेला होता.

हे सुद्धा वाचा

ढाब्याचा माजी कर्मचारी विकी हा मालकाशी पैशांवरून हुज्जत घालत असल्याचं अल्फाजने पाहिलं. ढाब्याच्या मालकाने पैसे देण्यास नकार दिल्याने तावातावाने विकी त्याचा टेम्पो ट्रक चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र हे करत असताना त्याने गाडीच्या मागे अल्फाज उभा असल्याचं पाहिलं नाही. टेम्पो रिव्हर्स करत असताना त्याने अल्फाजला धडक दिली.

अपघातानंतर अल्फाजला ताबडतोब फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर रविवारी अल्फाज शुद्धीवर आला. पोलिसांनी आरोपी विकीविरोधात कलम 279, 337 आणि 338 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

‘माझा भाऊ अल्फाजवर कोणीतरी जीवघेणा हल्ला केला. ज्याने कोणी हा प्लॅन बनवला, त्याला मी सोडणार नाही. कृपया अल्फाजच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा’, अशी पोस्ट रॅपर आणि गायक हनी सिंगने लिहिली होती. त्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अल्फाज हा रुग्णालयातील बेडवर झोपलेला पहायला मिळत आहे. त्याच्या शरीरावर अनेक जखमाही स्पष्ट दिसत आहेत.

अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.