AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rhea Chakraborty: रिया चक्रवर्तीला मिळालं नवं प्रेम; सुशांतच्या निधनानंतर 2 वर्षांनी ‘या’ व्यक्तीला करतेय डेट

रिया चक्रवर्ती 'या' बिझनेसमनला करतेय डेट; सुशांतला विसरून आयुष्यात गेली पुढे

Rhea Chakraborty: रिया चक्रवर्तीला मिळालं नवं प्रेम; सुशांतच्या निधनानंतर 2 वर्षांनी 'या' व्यक्तीला करतेय डेट
सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्तीImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 08, 2022 | 12:43 PM
Share

मुंबई: अभिनेत्री रिया चक्रवर्ती 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सर्वाधिक चर्चेत आली. सुशांतच्या मृत्यूप्रकरणातील ड्रग्जच्या अँगलचा तपास होत असताना त्यात रिया आणि तिचा भाऊ शौविकचं नाव समोर आलं होतं. या दोघांना अटकही झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर रिया बरेच दिवस माध्यमांपासून आणि सोशल मीडियापासून दूर होती. आता पुन्हा एकदा रिया चक्रवर्ती लाइमलाइटमध्ये आली आहे. रियाच्या आयुष्यात नवं प्रेम आल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

अभिनेत्री अंकिला लोखंडेशी ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत रियाला डेट करत होता. हे दोघं काही दिवस लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही राहिले होते, अशीही चर्चा होती. सुशांतच्या निधनानंतर रियाने अनेकदा त्याच्याविषयीचं प्रेम व्यक्त केलं. आता ती बंटी सजदेहला डेट करत असल्याचं समजतंय.

कोण आहे बंटी सजदेह?

बंटी हा रिॲलिटी स्टार आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेहचा भाऊ आहे. सीमा ही सोहैल खानची पूर्वाश्रमीची पत्नी आहे. स्पोर्ट्स आणि एंटरटेन्मेंट क्षेत्रातील एका मोठ्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा तो मालक आहे. काही वर्षांपूर्वी रियासुद्धा त्याच्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीची एक क्लाएंट होती, अशी माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपासून बंटी आणि रिया एकमेकांना डेट करत असल्याचं कळतंय.

View this post on Instagram

A post shared by Bunty Sajdeh (@buntysajdeh)

गेल्या काही वर्षांत रियाने ज्या काही समस्यांचा सामना केला, त्यात बंटीने तिची खूप साथ दिली. सुशांतला फसवल्याचा आरोप रियावर होत असताना बंटी तिच्या पाठिशी कायम होता, असंही म्हटलं जातंय.

जेव्हा रियाविरोधात विविध खटले दाखल झाले, तेव्हा बंटीलाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. याशिवाय 7 ऑक्टोबर रोजी बंटीच्या बर्थडे पार्टीतही रियाला पाहिलं गेलं. याआधी बंटी हा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला डेट करत होता.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.