होणाऱ्या पतीनेच लीक केला अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ; 6 वर्षांनंतर केला खुलासा

प्रायव्हेट व्हिडीओ लीकप्रकरणी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

होणाऱ्या पतीनेच लीक केला अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ; 6 वर्षांनंतर केला खुलासा
Rida IsfahaniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 2:24 PM

लाहोर- पाकिस्तानी अभिनेत्री रिदा इस्फहानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतीच तिने कॉमेडियन नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या खासगी आयुष्याविषयी धक्कादायक खुलासे केले. 2016 मध्ये रिदा तिच्या एका प्रायव्हेट व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. आता त्याच व्हिडीओबाबत तिने या पॉडकास्टमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

नोव्हेंबर 2016 मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री रिदा इस्फहानीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. आता रिदाने त्याबाबत खुलासा करताना सांगितलं की तिच्या होणाऱ्या पतीनेच तो व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. इतकंच नव्हे तर तो प्रायव्हेट व्हिडीओ लीक करणारा दुसरा-तिसरा कोणी नाही तर तिचा होणारा पतीच होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिदाचं लग्न मोडलं आणि तिच्यावर जोरदार टीकासुद्धा झाली होती.

हे सुद्धा वाचा

“मला काम मिळणं बंद झालं होतं. त्यावेळी मी काहीच बोलले नाही. कारण माझ्या विश्वासाला तडा गेला होता. जर तुमच्या विश्वासालाच तडा गेला असेल तर ते माणुसकी संपुष्टात आल्यासारखंच झालं. मी ‘वन वुमन मॅन’ टाइपची मुलगी आहे. जेव्हा मला त्याने प्रपोज केलं, तेव्हा मी त्याला होकार दिला. ज्या व्यक्तीवर मी प्रेम करते, त्याच्यासोबत मला माझं आयुष्य व्यतीत करायचं होतं. माझे आई-वडील या लग्नासाठी तयार नव्हते. मात्र माझ्यामुळे त्यांनी होकार दिला होता. मात्र साखरपुड्याच्या तीन महिन्यांनंतर ते फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले”, असं रिदाने सांगितलं.

या घटनेविषयी बोलताना ती पुढे म्हणाली, “त्यावेळी मी अमेरिकेत होते. अनेकांनी मला पत्रकार परिषद घेण्याची विनंती केली. मात्र मी तसं केलं नाही. हे सर्व कोणी केलं ते मला ठाऊक होतं. जे घडलं होतं, त्याला आयुष्यभर मला सहन करायचं होतं. त्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्या गोष्टींसोबतच मला अखेरच्या क्षणापर्यंत जगायचं आहे. लोक अशा प्रकरणांना विसरत नाहीत. मी पूर्णपणे खचले होते.”

या घटनेनंतर कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींचा सामना करणं अत्यंत कठीण झाल्याचंही तिने सांगितलं. या मुलाखतीत रिदाने तिच्या आईवर कोणीतरी काळी जादू केल्याचाही आरोप केला. “माझ्यासोबत चुकीचं करणाऱ्याला मी माफ केलं. मात्र गेल्या दहा वर्षांपासून जे माझ्या आईवर काळी जादू करत आहेत, त्यांना मी माफ करणार नाही”, असं विधान तिने केलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.