जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !

रिहानाच्या ट्वीटवर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौतने टीका केली आहे.

जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 8:22 AM

नवी दिल्ली : मागच्या दोन महिन्यांपासून देशाच्या राजधानीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. दिल्लीमध्ये वेगवेगळ्या बॉर्डर्सवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. या सगळ्यात जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने लिहलं आहे. इतकंच नाही तर रिहानाने ट्विट करताना ‘#FarmersProtest’ असा हॅशटॅगही वापरला आहे. पण रिहानाच्या या ट्वीटवर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौतने टीका केली आहे. (rihanna kangana tweet on farmers protest kangana criticized on rihanna)

रिहानाने ट्विट केलेल्या बातमीमध्ये दिल्लीमध्ये आंदोलनावेळी परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याची बातमी देण्यात आली आहे. त्यावर ट्वीट करत कंगनाने रिहानावर आणि शेतकरी आंदोलनावर टीका केली आहे. कंगनाने ट्वीटमध्ये उत्तर देताना यासंबंधी कोणीही बोलत नाही कारण आंदोलन करणारे शेतकरी नसून दहशतवादी असल्याचं कंगनाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तिच्या या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली आहे.

रिहानाच्या ट्विटवर प्रत्युत्तर देताना कंगनाने लिहलं की, ‘कोणीही याबद्दल बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत तर भारताचं विभाजन करण्याचा प्रयत्न करणारे दहशतवादी आहेत. जेणेकरुन चीनसारखे देश आपल्या देशाचा ताबा घेतील आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवतील. तू शांत बस, मूर्ख. आम्ही तुझ्यासारखे मूर्ख नाही आहोत जो आमचा देश विकू’

दरम्यान, फक्त रिहानानेच नाही तर ग्रेटा थनबर्गनेसुद्धा शेतकरी आंदोलनावर ट्वीट करत शेतकऱ्यांचं समर्थन केलं आहे. स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गनेदेखील शेतकरी आंदोलनावर ट्वीट केलं आहे. आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. (rihanna kangana tweet on farmers protest kangana criticized on rihanna)

संबंधित बातम्या –

मोदी सरकारला आव्हान देणारी कोण आहे जगप्रसिद्ध पॉपस्टार मॉडेल रिहाना?

मोदी सरकारविरोधात जगातल्या प्रसिद्ध पॉपस्टारचं ट्विट, इंटरनेट बंदीवर सवाल, कोण आहे रिहाना?

(rihanna kangana tweet on farmers protest kangana criticized on rihanna)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.