AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तो तेवढा सक्षम नाही…’ ऋषी कपूर यांनी ज्या अभिनेत्याला टॅलेंटवरून हिणवलं होतं, आज तो बॉलिवूडचा सुपरस्टार, करोडोंची संपत्ती

बॉलिवूडचा असा अभिनेता जो त्याच्या अभिनयासाठी फारसा सक्षम नाही असं वक्तव्य ऋषी कपूर यांनी केलं होतं. पण आज तोच अभिनेता बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. त्याची करोडोंची संपत्ती आणि एखाद्या महालासारखा बंगला आहे. कोण आहे हा अभिनेता माहितीये?

'तो तेवढा सक्षम नाही...' ऋषी कपूर यांनी ज्या अभिनेत्याला टॅलेंटवरून हिणवलं होतं, आज तो बॉलिवूडचा सुपरस्टार, करोडोंची संपत्ती
Rishi Kapoor had criticized Nawazuddin SiddiquiImage Credit source: instagram
| Updated on: Apr 06, 2025 | 10:49 AM
Share

अभिनेते ऋषी कपूर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांचे अनेकदा अनेक अभिनेत्यांसोबत वादही झाल्याचं म्हटलं जातं. तसेच ऋषी कपूर यांनी एका अभिनेत्याबाबत असंच काहीसं ट्रोल केलं होतं. त्याच्या टॅलेंटवरून त्याला हिणवलं होतं. तो कधीच पुढे जाऊ शकणार नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. पण आज तोच अभिनेता बॉलिवूडचा सुपस्टार आहे. करोडोंची संपत्ती आहे.

अभिनेता होण्याचा प्रवास खूप संघर्षाचा होता.

हा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीनला आज ओळखत नाही असा एकही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे, पण त्याचा सुप्रसिद्ध अभिनेता होण्याचा प्रवास खूप संघर्षाचा होता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याने स्वबळावर स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. पण एक काळ असा होता, तेव्हा ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी नवाझुद्दिनच्या अभिनयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

नवाझुद्दीची रोमँटिक आणि रोमान्स असलेल्या बॉलिवूड चित्रपटांवर टीका

नवाजुद्दिनने बॉलिवूडच्या रोमँटिक चित्रपटांबद्दल एक टिप्पणी केली होती. तेव्हापासून हा वाद सुरू झाला होता. नवाझुद्दिनने केलेली टिप्पणी ऋषी कपूर यांना खटकली होती. खरं तर, नवाझुद्दीन सिद्दीकीने रोमँटिक आणि रोमान्स असलेल्या बॉलिवूड चित्रपटांवर टीका केली होती. तो म्हणाला होता की, “काही कलाकार नेहमीच झाडांभोवती फिरत राहतात. त्याच प्रकारचा रोमान्स सध्या बॉलिवूडमध्ये दाखवताय. तो चित्रपटांना ‘क्लिच’ म्हणाला होता. वास्तविक जीवनात रोमान्स खूपच कठीण आणि मनोरंजक आहे.” असं म्हणाला होता. त्यानंतर ऋषी कपूर यांनी नवाझुद्दिनच्या विधानवर भाष्य केले होते.

ऋषी कपूर नवाजुद्दीनला सरासरी अभिनेता म्हणाले 

ऋषी कपूर ते त्यांच्या फिल्मी करियरच्या काळात रोमँटिक हिरो म्हणून प्रसिद्ध होते. 90 च्या काळात ‘रोमँटिक हिरो’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऋषी कपूर यांनी नवाजुद्दीनच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणालेले की, “रोमान्स करणे आणि गाणी गाणे सोपे नाही, परंतु ती एक कला देखील आहे.” ऋषी कपूर नवाजुद्दीनला सरासरी अभिनेता म्हणत ते पुढे म्हणाले की, “नवाझुद्दिनला रोमँटिक भूमिका साकारण्याची संधी मिळणार नाही आणि तो तशी भूमिका साकारण्यास सक्षमही नाही”

नवाजुद्दीनने शांतपणे प्रतिक्रिया दिली

ऋषी कपूर यांच्या या टिप्पणीवर नवाजुद्दीनने शांतपणे प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता की, “त्याचा अर्थ असा होता की, जेव्हा एखादा अभिनेता अनेक दशकांपासून एकाच प्रकारच्या भूमिका करतो तेव्हा तो नैसर्गिकरित्या आणि सहजपणे अभिनय करतो. मी स्वतःला रोमँटिक भूमिकांपुरते मर्यादित ठेवू इच्छित नाही, परंतु जर त्याला अशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली तर तो ती वेगळ्या शैलीत स्वत:ला सादर करेल.” नवाझुद्दिन आणि ऋषी कपूर यांनी ‘मंटो और फॅमिली’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.

दोन्हीही अभिनेत्यात झालेल्या वादानंतर नवाजुद्दीनने ऋषी कपूर यांच्या प्रती आदर कायम ठेवेल असे भाष्य केले होते. या शिवाय, मी ऋषी कपूर यांचा फार मोठा फॅन आहे, असं ही तो म्हणाला होता.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.