Ved: रितेश-जिनिलियाचं ‘वेड’ पाहून सई ताम्हणकर म्हणाली ‘कडक’; कमावले इतके कोटी रुपये

2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटानंतर रितेशचा वेड हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मजिली’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे.

Ved: रितेश-जिनिलियाचं 'वेड' पाहून सई ताम्हणकर म्हणाली 'कडक'; कमावले इतके कोटी रुपये
Ved MovieImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 11:01 AM

मुंबई: अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाला चौथ्या आठवड्यातही दमदार प्रतिसाद मिळतोय. 30 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. आतापर्यंत ‘वेड’ने कमाईचा 50 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. यानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित रितेशने चाहत्यांचे आभार मानले आहेत. वेड या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात तर जिनिलियाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.

‘वेड’ची कमाई-

पहिला आठवडा- 20.18 कोटी रुपये दुसरा आठवडा- 20.67 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

‘वेड’ची कमाई 50 कोटी रुपये झाल्यानिमित्त रितेशने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. ‘शब्द अपुरे पडत आहेत. वेड चित्रपटाला मोठ्या मनाने आपण स्वीकारलं आणि भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार’, अशा शब्दांत रितेशने चाहत्यांचे आभार मानले.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

त्याच्या या पोस्टवर अभिनेत्री सई ताम्हणकरने ‘कडक’ अशी कमेंट केली. तर लेखक क्षितिज पटवर्धननेही रितेश-जिनिलियाचं कौतुक केलं. बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता आणि प्रसिद्ध गायक अरमान मलिक यांनीसुद्धा कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटानंतर रितेशचा वेड हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मजिली’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. मूळ चित्रपटात समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

20 जानेवारीपासून ‘वेड’चं नवीन व्हर्जन

‘वेड’ चित्रपटात आता सत्या (रितेश देशमुख) आणि श्रावणी (जिनिलिया देशमुख) यांच्यावर चित्रित केलेलं ‘वेड तुझं’ या गाण्याचं नवीन व्हर्जन समाविष्ट करण्यात येणार आहे. यासोबतच तीन नवे सीन्सही चित्रित करून त्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘वेड’चं हे नवीन व्हर्जन प्रेक्षकांना थिएटरमध्ये येत्या 20 जानेवारीपासून पहायला मिळणार आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.