Ved: रितेश-जिनिलियाने प्रेक्षकांना लावलं ‘वेड’; आतापर्यंत कमावले इतके कोटी रुपये
दुसऱ्या आठवड्यातही 'वेड'ला जबरदस्त प्रतिसाद; रितेश-जिनिलियाची जोडी ठरली हिट!
मुंबई: अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा यांच्या ‘वेड’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटातून अभिनेत्री जिनिलियाने बऱ्याच वर्षांनंतर कमबॅक केलं आहे. तर रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलंय. रितेश-जिनिलियाची ऑफस्क्रीन केमिस्ट्री तर चाहत्यांना आवडतेच. मात्र आता या दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. ‘वेड’ या चित्रपटाच्या दुसऱ्या आठवड्यातील कमाईचे आकडे समोर आले आहेत.
रितेश-जिनिलियाचा हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून हा चित्रपट हाऊसफुल आहे. समिक्षकांकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पहिल्या आठवड्यात ‘वेड’ने 20.67 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर आठव्या दिवसाची कमाई ही सातव्या दिवसापेक्षाही अधिक झाल्याचं पहायला मिळालं.
प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारपर्यंत या चित्रपटाची कमाई 30 कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने वर्तवला. ‘वेड’ची आठ दिवसांची कमाई 23.19 इतकी झाली आहे. दुसऱ्या शुक्रवारी या चित्रपटाने 2.52 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
View this post on Instagram
‘पहिल्या आठवड्याचं वेड लावणारं बॉक्स ऑफिस कलेक्शन, प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार, आपलं प्रेम असंच राहू द्या’, अशा शब्दांत रितेशने प्रेक्षकांचे आभार मानले. ‘वेड’ हा ‘मजिली’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. मूळ चित्रपटात समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य या जोडीने मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
#Marathi film #Ved is SUPER-STRONG on [second] Fri… In fact, Day 8 is HIGHER than Day 7… A solid weekend is on the cards, should hit ₹ 30 cr [+/-] by [second] Sun… EXCELLENT… [Week 2] Fri 2.52 cr. Total: ₹ 23.19 cr. pic.twitter.com/K8WManO4lf
— taran adarsh (@taran_adarsh) January 7, 2023
वेड या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाशिवाय जिया शंकर, शुभंकर तावडे, अशोक सराफ, विद्याधर जोशी, विक्रम गायकवाड, खुशी हजारे आणि विनीत शर्मा यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटातील जिनिलियाचा सहज अभिनय आणि प्रसन्न वावर प्रेक्षकांना खूपच भावला. प्रेमात माणूस वेडा होतो की जगावेगळी माणसं असं वेडं प्रेम करतात, अशा दोन्ही पद्धतीचं प्रेम ‘वेड’ चित्रपटात पहायला मिळतं.