रितेश-जिनिलियाने कंपनीसाठी घेतला 120 कोटी रुपयांचा लोन; होणार चौकशी

रितेश-जिनिलियाची मालकी असलेल्या कंपनीची होणार चौकशी; नेमकं काय आहे प्रकरण?

रितेश-जिनिलियाने कंपनीसाठी घेतला 120 कोटी रुपयांचा लोन; होणार चौकशी
रितेश आणि जिनिलिया देशमुखImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 11:50 AM

लातूर: अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख हे त्यांच्या कंपनीमुळे अडचणीत सापडले आहेत. राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं की रितेश-जिनिलिया यांच्या कृषी-प्रक्रिया कंपनीला मिळालेल्या लोनसंबंधी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रितेश-जिनिलियाच्या कंपनीला लोन देताना सहकारी बँकांकडून कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली का, याचा तपास या चौकशीत होणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

गेल्या महिन्यात भाजपच्या नेत्यांनी हा आरोप केला होता की देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या अॅग्रो प्रोसेसिंग कंपनीला महाविकास आघाडी सरकारच्या काळात लातूरमधील एमआयडीसीचा प्लॉट मिळाला होता. कंपनीने 4 ऑक्टोबर 2021 रोजी पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत लोनसाठी अर्ज केला होता, असाही आरोप भाजप नेत्यांनी केला होता. त्यानंतर बँकेनं 27 ऑक्टोबर रोजी 4 कोटी रुपयांच्या लोनला मंजुरी दिली होती.

कंपनीने लातूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेत 61 कोटी रुपयांच्या लोनसाठी अर्ज केला होता. यालाही 27 ऑक्टोबर रोजी मंजुरी मिळाली होती. त्यानंतर याच बँकेतून 55 कोटी रुपयांचा लोन 25 जुलै 2022 रोजी घेण्यात आला.

हे सुद्धा वाचा

राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे याप्रकरणी म्हणाले, “भाजपचे लातूर जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ मागे यांनी एक पत्र लिहून हा मुद्दा उपस्थित केला आहे. मला एमआयडीसीबद्दल काहीच माहीत नाही. मात्र मी चौकशीचे आदेश दिले आहेत. कर्ज देताना बँकेकडून कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली का, याची चौकशी होईल.”

रितेश आणि जिनिलिया यांच्या कंपनीला देशमुख कुटुंबाचं वर्चस्व असणाऱ्या बँकेकडून लगोलग इतकं कर्ज कसं मिळालं, अवघ्या 30 दिवसांच्या कालावधीत लातूर एमआयडीसीमध्ये कंपनीला प्लॉट कसा मिळाला, असे प्रश्न भाजपने विचारले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.