Riteish Deshmukh | रितेश देशमुखचं पत्नी जिनिलियाशी भांडण? सर्वांसमोर म्हणायला लावलं ‘सॉरी’

सोशल मीडियावर या व्हिडीओमध्ये रितेश आणि जिनिलिया वेगवेगळे बसलेले दिसत आहेत. भांडणानंतर हे दोघं एकमेकांवर नाराज आहेत. यामध्ये जिनिलिया म्हणते, "जे व्हायचं होतं ते झालं, आता काय करायचं आहे?"

Riteish Deshmukh | रितेश देशमुखचं पत्नी जिनिलियाशी भांडण? सर्वांसमोर म्हणायला लावलं 'सॉरी'
Riteish Deshmukh and Genelia D'souzaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 12:06 PM

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख हे नुकतेच ‘वेड’ या चित्रपटात एकत्र झळकले. या चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलियाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. रितेशसोबतची तिची जोडी ही चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघं सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. चाहत्यांसोबत ते विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच या दोघांचा एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामुळे त्यांच्यातील भांडणाची चर्चा होऊ लागली आहे. भांडण झाल्यानंतर रितेश आणि जिनिलिया त्यावर उपाय काढण्याचा प्रयत्न करत असतात. इतकंच नव्हे तर या व्हिडीओमध्ये जिनिलियाला सर्वांसमोर ‘सॉरी’ म्हणावं लागलं आहे.

सोशल मीडियावर या व्हिडीओमध्ये रितेश आणि जिनिलिया वेगवेगळे बसलेले दिसत आहेत. भांडणानंतर हे दोघं एकमेकांवर नाराज आहेत. यामध्ये जिनिलिया म्हणते, “जे व्हायचं होतं ते झालं, आता काय करायचं आहे?” त्यानंतर रितेश तिला म्हणतो, ‘सॉरी बोल’. हे ऐकून जिनिलिया सर्वांसमोर म्हणते ‘अच्छा सॉरी’. जिनिलियाची ही माफी रितेशला आवडत नाही आणि तो तिला फक्त सॉर म्हणायला सांगतो. त्यानंतर जेव्हा जिनिलिया ‘सॉरी’ म्हणते तेव्हा तो आनंदाने नाचू लागतो. रितेश आणि जिनिलिया नेहमीच इन्स्टाग्राम रिलद्वारे चाहत्यांना हसविण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या व्हिडीओमागचा उद्देशसुद्धा हाच होता. यामध्ये पुन्हा एकदा दोघांची क्युट केमिस्ट्री पहायला मिळाली.

हे सुद्धा वाचा

रितेश आणि जिनिलिया यांनी 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. दोघांचा हा पहिलाच चित्रपट होता. मोठ्या पडद्यावर एकत्र झळकलेली जोडी चाहत्यांना भावली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया डिसूझा यांची भेट झाली होती. आणि काहीच दिवसात ते दोघे खूप चांगले मित्र बनले आणि मग दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांचे लग्न झाले. नोव्हेंबर 2014 रोजी, जिनिलियाने त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव त्यांनी दोघांनी ‘रायन’ ठेवले. या दोघांच्या दुसर्‍या मुलाचा जन्म जून 2016 मध्ये झाला आणि त्याचे नाव राहील असे ठेवले आहे.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.