Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासूकडून सतत टीका झाल्यानंतर अंकिता लोखंडेसाठी रितेश देशमुखची पोस्ट चर्चेत

हा शो संपल्यानंतर अंकिता आणि विकी विभक्त होतील की काय, अशी भीती चाहत्यांना वाटू लागली आहे. बिग बॉसच्या घरात विकीला अंकितावर हात उचलतानाही पाहिलं गेलं. तर अंकिताही विकीला लाथ मारताना, चप्पल फेकताना दिसली. फॅमिली वीकदरम्यान जेव्हा विकीची आई बिग बॉसच्या घरात आली, तेव्हा दोघांमधील गोष्टी आणखी विकोपाला पोहोचल्या.

सासूकडून सतत टीका झाल्यानंतर अंकिता लोखंडेसाठी रितेश देशमुखची पोस्ट चर्चेत
Ankita Lokhande and Riteish DeshmukhImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 13, 2024 | 8:31 AM

मुंबई : 13 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’ या शोमधील प्रवास अभिनेत्री अंकिता लोखंडेसाठी अनेक दृष्टीने आव्हानात्मक ठरतोय. पती विकी जैनसोबत बिग बॉसच्या घरात आल्यापासून या दोघांमध्ये सतत भांडणं होताना दिसतायत. यावरून तिला तिच्या सासरच्या मंडळींकडूनही बरंवाईट ऐकावं लागतंय. थेरपी रुममध्ये विकीच्या आईशी बोलल्यानंतर अंकिताला समजलं की तिच्या वागणुकीमुळे तिच्या आईलाही समस्यांचा सामना करावा लागतोय. फॅमिली वीकदरम्यान जेव्हा अंकिताची आई तिला भेटायला आली, तेव्हा ती खूप भावूक झाली. विकीच्या आईकडून सतत तिच्यावर टीका केली जातेय. हे सर्व घडत असतानाच आता अनेक सेलिब्रिटींनी अंकिताची साथ दिली आहे. रितेश देशमुख, काम्या पंजाबी, रिधी डोग्रा, रश्मी देसाई यांसारख्या सेलिब्रिटींनी तिला पाठिंबा दिला आहे.

रितेश देशमुखने ‘एक्स’वर (ट्विटर) अंकितासाठी एक पोस्ट लिहिली आहे. ‘अंकिता खूप चांगल्या मनाची आहे’, असं त्याने म्हटलंय. अभिनेत्री रिधी डोग्रानेही तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ‘प्रत्येक महिलेचं पहिलं पाऊल आणि पहिला प्रयत्न तिचं नातं किंवा लग्न वाचवण्यासाठीच असतो आणि ती ते करेल. त्यामुळे जेव्हा शब्दांनी लढाई लढली जाऊ शकत नाही. तेव्हा विजय हा पेनकिलरचं काम करतो. हा अनुभव तिच्यासाठी कटूगोड असेल. अंकिताने हा शो जिंकावा’, अशी आशा रिधीने व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री काम्या पंजाबीनेही अंकिताचं समर्थन केलं आहे. ‘तुम्ही तुमच्या आयुष्यात कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी करण्यास हे घर भाग पाडतं. हा प्रवास खूप कठीण आहे आणि प्रत्येक वेळी तुम्हीच बरोबर असाल असं नसतं. चढउतार येतच असतात. पण कोणालाच अशी वागणूक मिळू नये. अंकिता.. तुला वाटतं त्यापेक्षा तू खूप स्ट्राँग आहेस’, असं काम्याने लिहिलंय. याशिवाय अर्जुन बिजलानी, अनिला हसनंदानी, प्रिया मलिक यांनीसुद्धा अंकितासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत. तिनेच हा शो जिंकावा, अशी इच्छाही अनेकांनी व्यक्त केली आहे.

‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येक स्पर्धकाच्या संयमाची परीक्षा घेतली जाते. बाहेरच्या जगाशी कोणताच संपर्क न ठेवता बिग बॉसच्या घरात प्रत्येक स्पर्धकाशी जुळवून घेत स्पर्धेत टिकून राहणं खूप आव्हानात्मक असतं. अशातच जवळच्या व्यक्तींकडून साथ मिळाली नाही तर त्याचा नकारात्मक परिणाम त्या स्पर्धकावर होतो. असंच काहीसं सध्या ‘बिग बॉस 17’च्या घरात अंकिता लोखंडेसोबत घडताना दिसतंय. अंकिताने ऑक्टोबर महिन्यात पती विकी जैनसोबत बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभाग घेतला. तेव्हापासून या दोघांमध्ये सतत विविध कारणांवरून वाद होताना दिसतंय. पतीसोबतचे वाद असतानाच अंकिताची सासू म्हणजेच विकी आईसुद्धा तिच्याविरोधात वक्तव्ये करताना दिसतेय. या सर्वांचा परिणाम अंकितावर झाला असून ती विकीसोबत ब्रेक घेण्याविषयीही बोलताना दिसतेय.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.