रितेश – जिनिलिया यांच्यासोबत तुमचाही ‘व्हॅलेंटाईन डे’ होईल खास , अभिनेत्याकडून कपलसाठी मोठी भेट

सर्वात क्यूट कपल रितेश - जिनिलिया यांच्यासोबत साजरा करा तुमचाही 'व्हॅलेंटाईन डे'... अभिनेत्याने चाहत्यांना दिली मोठी भेट.... 'या' भेटवस्तूबद्दल तुम्हाला काही माहिती नसेल तर...

रितेश - जिनिलिया यांच्यासोबत तुमचाही 'व्हॅलेंटाईन डे' होईल खास , अभिनेत्याकडून कपलसाठी मोठी भेट
रितेश - जिनिलिया
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 10:42 AM

Riteish – Genelia : प्रेम म्हणजे काय असतं? याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia D’Souza)... रितेश – जिनिलिया कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. रितेश – जिनिलिया कायम त्यांच्या गोड नात्यामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील कायम रितेश – जिनिलिया यांची चर्चा असते. इन्स्टाग्रामवर वेग-वेगळ्या अंदाजातील रिल शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी रितेश – जिनिलिया स्टारर ‘वेड’ (ved) सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमाचे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

चाहत्यांनी देखील रितेश – जिनिलिया यांच्या ‘वेड’ सिनेमाला डोक्यावर घेतलं. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई केली. रितेश – जिनिलिया स्टारर ‘वेड’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ७० कोटी रुपयांची कमाई केली. पण चाहत्यांच्या मनात असलेली ‘वेड’ सिनेमाची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. अनेकांनी सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात गर्दी केली. (riteish deshmukh and genelia d’souza movie)

हे सुद्धा वाचा

पण काही चाहत्यांनी अद्यापही रितेश – जिनिलिया यांचा ‘वेड’ सिनेमा पाहिलेला नाही. जर तुम्ही देखील ‘वेड’ सिनेमा पाहिला नसेल, तर आता तुम्हाला ‘वेड’ सिनेमा तुमच्या पार्टनरसोबत मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. रितेश – जिनिलिया यांच्या चाहत्यांना ‘वेड’ सिनेमा पाहण्यासाठी आणखी एक संधी आहे, ती ही अत्यंत कमी दरात. खु्द्द रितेश याने पोस्ट शेअर करत चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. ( riteish deshmukh and genelia d’souza child)

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने रितेश याने चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. चाहत्यांना १३ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी पर्यंत ‘वेड’ सिनेमा फक्त ९९ रुपयांमध्ये सिनेमागृहात पाहता येणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याने ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने चाहत्यांना दिलेल्या खास भेटवस्तूची चर्चा रंगत आहे. त्यामुळे रितेश – जिनिलिया यांच्या सोबत तुम्हीही तुमचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करु शकता. (Riteish Genelia lovestory)

रितेश – जिनिलिया स्टारर ‘वेड’ सिनेमा ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. सिनेमा आणि सिनेमातील गाण्यांना चाहत्यांनी प्रचंड प्रेम दिलं. आता रितेश याची पोस्ट वाचून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. त्यामुळे १३ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी पर्यंत ‘वेड’ सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी सिनेमागृहात किती गर्दी जमते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.