‘त्याक्षणी जाणवलं की इतका फरक का पडतोय?’; रोहित राऊत-जुईली जोगळेकरची प्यारवाली लव्ह-स्टोरी

गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची जोडी फार प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या दोघांनी लग्न केलं. सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या मंचावर दोघांची एकमेकांशी भेट झाली. मात्र या भेटीचं प्रेमात कसं रुपांतर झालं, ते जाणून घेऊयात..

'त्याक्षणी जाणवलं की इतका फरक का पडतोय?'; रोहित राऊत-जुईली जोगळेकरची प्यारवाली लव्ह-स्टोरी
Rohit Raut and Juilee JoglekarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 11:58 AM

मुंबई : 18 नोव्हेंबर 2023 | जर तुम्हाला गाण्यांची फार आवड असेल आणि गाण्याचे काही रिॲलिटी शोज पाहिले असतील तर रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर ही जोडी नक्कीच माहीत असेल. रोहितने ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’पासून विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. आपल्या गायकीने त्याने श्रोत्यांची मनं जिंकली. अशाच एका कार्यक्रमामध्ये त्याची जुईली जोगळेकरशी भेट झाली. गेल्याच वर्षी या दोघांनी पुण्यातील ढेपेवाडा याठिकाणी लग्नगाठ बांधली. आज रोहितचा वाढदिवस आहे. त्याचा वाढदिवस आणि जुईलीसोबतची लव्ह-स्टोरी यांमध्ये एक खास कनेक्शन आहे. ते कनेक्शन नेमकं काय आहे आणि या दोघांची लव्ह-स्टोरी कशी सुरु झाली, ते जाणून घेऊयात..

एका मुलाखतीत रोहित आणि जुईलीने हा किस्सा सांगितला. प्रेमकहाणीबद्दल सांगताना रोहित म्हणाला, “आमच्या लव्ह-स्टोरीची सुरुवात अत्यंत विचित्रपणे झाली. त्यावेळी मैत्रीतही आमचं एकमेकांशिवाय पानही हलत नव्हतं. अचानक एकदा जुई लंडनला एका टूरसाठी गेली होती. या टूरच्या तीन दिवस आधी आम्ही भेटलो होतो. माझ्या वाढदिवशी तू मला भेट. आपण मित्रमैत्रिणींसोबत मिळून पार्टी करू असं मी जुईला सांगितलं होतं. पण तेव्हा तिने लंडनला असल्याचं म्हटलं होतं. माझ्या वाढदिवशी मित्रमैत्रिणींनी, जवळच्या व्यक्तींनी मला शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि माझ्यासाठी भेटवस्तू आणले पाहिजेत, असा माझा अट्टहास असतो. त्यामुळे जुईली लंडनला असल्याने तिला तिथून काहीतरी माझ्यासाठी आणायला सांगितलं होतं. वाढदिवशी मी संपूर्ण दिवसभर जुईलीच्या फोनची वाट पाहत होतो.”

हे सुद्धा वाचा

यावेळी जुईली म्हणाली, “मी लंडनला शोजमध्ये व्यस्त होते. त्यामुळे तिथे वायफायची सुविधा वगैरे नव्हती. मी दुसऱ्या नंबरवरून रोहितला फोन करत होते, पण त्याने माझे फोन उचलले नाहीत.” सहसा दुसऱ्या नंबरवरून कोणी जवळची व्यक्ती फोन करणार नाही, या भ्रमात रोहित होता. म्हणूनच त्याने ते फोन उचललं नसल्याचं स्पष्ट केलं. पण जुईलीने फोन केला नाही, या विचारात रोहित त्यादिवशी खूप निराश झाला होता. जुईली लंडनवरून आल्यानंतर जेव्हा रोहितला भेटली, तेव्हा तो तिच्यावर खूप रागावला.

“जुईली गप्प  तिथून गेली आणि पाच मिनिटाने परत त्याच्याकडे आली. तिच्या हातात एक बॅग होती आणि त्यात लेदर जॅकेट होतं. लंडनमधून तिने ते माझ्यासाठी आणलं होतं. ते मला इतकं आवडलं होतं की 2015 ते 2017 मध्ये अनेक शोजमध्ये मी ते जॅकेट वापरलं होतं. त्यावेळी आम्ही एकमेकांना हा प्रश्न विचारला की आपल्याला का इतका फरक पडतोय? आपण एखाद्याशी बोललो किंवा भेटलो नाही तर इतकं वाईट का वाटतंय? तेव्हा आम्हाला जाणवलं की आम्ही प्रेमात आहोत. त्या व्यक्तीच्या असण्याने आणि नसण्याने फरक पडतो, हे जाणवलं. तेव्हापासून आजतागायत आमचं एकमेकांशिवाय पान हलत नाही. काय जेवायचं इथपासून ते फिरायला कुठे जायचं इथपर्यंत आम्ही एकमेकांना विचारून करतो”, असं रोहितने सांगितलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.