बॉलिवूड संपल्यात जमा? पहा रोहित शेट्टी याने यावर काय उत्तरं दिली?, आता तुम्हीच ठरवा पुढे काय होणार?
बॉलिवूड संपलंय, असं म्हणणाऱ्यांना रोहित शेट्टी याने जे काही सुनवलंय, तुम्ही नक्की ऐका रोहित शेट्टी काय म्हणतोय, बॉलिवूडचं काय झालं आणि काय होणार?
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा वाद सुरू आहे. दाक्षिणात्य चित्रपटांसमोर बॉलिवूडचे चित्रपट फिके पडत असल्याची चर्चा आहे. एकीकडे साऊथचे चित्रपट दणक्यात कमाई करत असताना बॉलिवूड मात्र हिट चित्रपट का देऊ शकत नाहीये, असा प्रश्न दिग्दर्शक रोहित शेट्टीला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
काय म्हणाला रोहित शेट्टी?
“गेल्या दोन वर्षांपासून आपण कोरोना महामारीचा सामना केला. आमचे जे काही मोठे चित्रपट होते, त्यांचं काम सुरू होऊ शकलं नाही. तर काहींचं पूर्ण होऊ शकलं नाही. साऊथचे जे चित्रपट हिट झाले, त्यांचं काम आधीच पूर्ण झालं होतं. आमचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. आपल्याकडे द काश्मीर फाईल्स, भुलभुलैय्या 2 आणि आता दृश्यम 2 यांसारख्या चित्रपटांनी चांगली कामगिरी केली. गंगुबाई काठियावाडी या चित्रपटालाही यश मिळालं. त्यामुळे आमचे चित्रपट चालत नाही, असं काही नाही. तिकडचा विचार केला तर, तिथली लोकं तर संपावर गेली होती. तुम्ही तिकडच्या सहा चित्रपटांची नावं घेतली, मी इकडच्या सहा चित्रपटांची नावं घेतली. तरीसुद्धा नेहमी आपल्याला दुसऱ्याकडची गोष्ट चांगली दिसते”, असं रोहित म्हणाला.
“एक वर्ष वाईट काय गेलं, तुम्ही तर..”
“कोरोनामुळे आपल्याकडे मोठमोठ्या दिग्दर्शकांचे चित्रपट पूर्ण होऊ शकले नाहीत. राजकुमार हिरानी यांचा चित्रपट आला नाही, संजय लीला भन्साळी हे लवकरच रणवीरसोबत काम करणार आहेत. रोहित शेट्टीनेही सिंघम बनवलाय. आपल्याकडेसुद्धा पठाण, फायटर, टायगर जिंदा है हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. इतकी वर्षे आम्ही तुमचं मनोरंजन केलं आणि आता एक वर्ष वाईट गेलं तर तुम्ही आमची साथ सोडली”, असं तो पुढे म्हणताच उपस्थितांनी रोहितच्या नावाचा गजरच सुरू केला.
बॉलिवूडच्या हिट चित्रपटांची यादी
साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूडच्या या वादाबद्दल पुढे बोलताना त्याने आतापर्यंतच्या हिट चित्रपटांची मोठी यादीच वाचून दाखवली. “लहानपणापासून तुम्ही अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण यांचे चित्रपट पाहिले असतील. अमर अकबर अँथनी, डॉन, शोले, खिलाडी, हम आपके है कौन, मैने प्यार किया, दिलवाले दुल्हनियाँ, सिंघम, सूर्यवंशी, गोलमा, लगे रहो मुन्नाभाई यांसारखे चित्रपट तुम्ही पाहिले असतील. एक वर्ष काय वाईट गेलं आणि तुम्ही पलटी मारली,” अशा शब्दांत त्याने उत्तर दिलं.
“आम्ही टायटॅनिकला बुडू देणार नाही”
“शोले आम्ही बनवला, मुघल-ए-आझम आम्ही बनवला, मदर इंडिया आम्ही बनवला. वाईट मानू नका, मात्र जेव्हा जहाजात छित्र पडतं, तेव्हा सर्वांत आधी उंदिर पळ काढतात. मात्र आम्ही टायटॅनिकला बुडू देणार नाही, आम्हाला उडवता येतं, उडवून या इंडस्ट्रीला पुढे नेऊ. आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की, कोरोना महामारीच्या काळात जेव्हा थिएटरमध्ये 50 टक्के आसनक्षमतेचा नियम होता, प्रेक्षक मास्क लावून यायचे, तेव्हा सूर्यवंशी 193 कोटींचा व्यवसाय केला होता. आताचं गणित पाहिलं तर ते 350 कोटी रुपये होतील,” असा हिशोब रोहितने सांगताच उपस्थित रोहित-रोहितची घोषणाच करू लागले.