‘हजार वेळा तुझ्याशीच लग्न करेन’ म्हणत 58 वर्षीय अभिनेत्याने पत्नीशीच बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ

प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयने दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. पत्नी नीलमशीच रोनितने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. लग्नाच्या विसाव्या वाढदिवसानिमित्त दोघांनी पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका मंदिरात हिंदू विवाहपद्धतीनुसार दोघांनी विवाह केला. त्याचे व्हिडीओ रोनितने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

'हजार वेळा तुझ्याशीच लग्न करेन' म्हणत 58 वर्षीय अभिनेत्याने पत्नीशीच बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ
रोनित रॉयने पत्नीशीच केलं दुसऱ्यांदा लग्नImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 9:21 AM

मुंबई : 26 डिसेंबर 2023 | प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता रोनित रायने 25 डिसेंबर रोजी पत्नी नीलम बोससोबत लग्नाचा 20वा वाढदिवस साजरा केला. वीस वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधत नात्याची नवीन सुरुवात केली. रोनितने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. ‘मुझसे शादी करोगी? फिर से’, असं कॅप्शन लिहित रोनितने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. एका मंदिरात मोजक्या कुटुंबीयांच्या आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत रोनित आणि नीलम यांनी पुन्हा एकदा एकमेकांची आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं. विशेष म्हणजे त्यांच्या 16 वर्षीय मुलाला आपल्या आईवडिलांच्या लग्नाचा साक्षीदार होता आलं.

या व्हिडीओमध्ये रोनित आणि नीलम हे हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न करताना दिसत आहेत. यावेळी रोनितने कुर्ता आणि पायजमा घातला होता. तर निलमने लाल रंगाचा सलवार सूट परिधान केला होता. ‘दुसऱ्यांदा काय, हजार वेळा मी तुझ्याशीच लग्न करेन. लग्नाच्या 20 व्या वाढदिवसानिमित्त तुला शुभेच्छा’, असं कॅप्शन देत रोनितने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘लोक पाच वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत आणि तुम्ही लग्नाच्या वीस वर्षांनंतर पुन्हा लग्न करत आहात. खूपच सुंदर’, असं एकाने लिहिलं. तर ‘खरं प्रेम या जगात अस्तित्वात आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी या दोघांचा आशीर्वादसुद्धा दिला आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Ronit Roy (@ronitboseroy)

View this post on Instagram

A post shared by Ronit Roy (@ronitboseroy)

View this post on Instagram

A post shared by Ronit Roy (@ronitboseroy)

रोनित रॉय आणि नीलम बोस यांनी 2003 मध्ये लग्न केलं होतं. त्याआधी साडेतीन वर्षांपर्यंत दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नसोहळ्याला इंडस्ट्रीतील बरेच कलाकार उपस्थित होते. मुंबईतील मड आयलँड याठिकाणी द रिसॉर्ट हॉटेलमध्ये रोनित आणि नीलमने लग्न केलं होतं. या लग्नसोहळ्याला झरीना वहाब, आदित्य पांचोली, अपूर्व अग्निहोत्री, प्रेम चोप्रा, सोनू निगम, करिश्मा तन्ना, अली असगर यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित होते.

रोनित रॉयने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत मिस्टर बजाजची भूमिका साकारली होती. त्याने पहिलं लग्न जोआनाशी केलं होतं. या दोघांना एक मुलगी असून तिचं नाव ओना असं आहे. रोनित आणि जोआना हे 1997 मध्ये विभक्त झाले आणि त्यानंतर तो नीलमला डेट करू लागला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.