हुबेहूब आलिया हिच्यासारख्या दिसणाऱ्या मुलीला पाहून तुम्हीही गोंधळाल, पाहा व्हिडीओ
'ही तर आलियाची जुडवा बहीण', हुबेहूब आलिया हिच्यासारखी दिसणाऱ्या सुंदर मुलीचा सोशल मीडियावर बोलबाला, तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी
मुंबई : जगात एकसारख्या दिसणाऱ्या सात व्यक्ती असतात असं म्हणतात. पण यावर विश्वास ठेवणं तितकच कठीण असतं. पण आतापर्यंत अनेक सेलिब्रिंटीसारखे दिसणारे चेहरे समोर आले. अभिनेत्री ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित यांच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. पण आता बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासारख्या दिसणाऱ्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हुबेहूब आलियासारख्या दिसणाऱ्या मुलीचं नाव रोशनी अंसारी असं आहे.
रोशनी सोशल मीडिया स्टार आहे. इन्स्टाग्रामवर रोशनीला फॉलो करणाऱ्या लोकांची संख्या देखील फार मोठी आहे. रोशनीचे व्हिडीओ पाहून तुम्ही देखील गोंधळाल, कारण रोशनी हुबेहूब आलिया भट्ट हिच्यासारखी दिसत आहे. सध्या सोशल मीडिआवर आलिया सारख्या दिसणाऱ्या रोशनीची चर्चा तुफान रंगत आहे.
View this post on Instagram
रोशनीने आलियाच्या सिनेमातील अनेक सीनवर रिल्स तयार केले आहेत. इन्स्टाग्रामवर रोशनीचे तब्बल 134K फॉलोर्स आहेत, तर रोशनी फक्त 122 जणांना फॉलो करते. रोशनी कायम सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत रोशनी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
View this post on Instagram
आलिया भट्टबद्दल सांगायचं झालं तर, आलिया सध्या मुलगी राहा हिच्यासोबत वेळ व्यतीत करत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट हिने गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात अभिनेता राणबीर कपूर याच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने सोनोग्राफीचा एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आलिया हिने ६ नोव्हेंबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
आई झाल्यानंतर आलिया पहिल्यांदा ‘Heart of stone’ या हॉलिवूड सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर ‘Heart of stone’सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलियाचा ‘Heart of stone’सिनेमा प्रदर्शित होणार आहे.