हिना खानने माफी मागावी.., अभिनेत्रीने शेअर केला रिपोर्ट; ‘स्टेज 3’ कॅन्सरबद्दल खोटं बोलल्याचा दावा
अभिनेत्री हिना खानचे मेडिकल रिपोर्ट्स सोशल मीडियावर पोस्ट करत एका अभिनेत्रीने तिच्यावर टीका केली आहे. हिनाने स्टेज 3 कॅन्सरबद्दल खोटं बोलल्याचा दावा या अभिनेत्रीने केला आहे. इतकंच नव्हे तर हिनाने जाहीर माफी मागावी अशी मागणी तिने केली आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. सोशल मीडियाद्वारे ती सतत चाहत्यांना याबद्दलची माहिती देत आहे. त्याचप्रमाणे उपचाराविषयी ती जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. एकीकडे हिना लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून चाहते आणि कलाविश्वातील मंडळी प्रार्थना करत आहेत. तर दुसरीकडे एका अभिनेत्रीने हिना खानवर खोटं बोलल्याची टीका केली आहे. हिना तिच्या उपचारांविषयी, कॅन्सरविषयी खोटं बोलत असल्याचा धक्कादायक दावा या अभिनेत्रीने केला आहे. इतकंच नव्हे तर तिने रुग्णालयातून हिना खानचे रिपोर्ट्ससुद्धा काढले आहेत.
हिना खानवर टीका करणारी ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून रोजलिन खान आहे. रोजलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हिनाच्या कॅन्सरचे रिपोर्ट्स शेअर केले आहेत. हिनाने स्टेज 3 कॅन्सरबद्दल खोटं बोलल्याचा दावा तिने केला आहे. हिनाला स्टेज 3 नव्हे तर स्टेज 2 कॅन्सरचं निदान झाल्याचं रोजलिनने म्हटलंय. “कॅन्सरचं निदान लवकर झाल्याने तिने उपचारसुद्धा लवकर सुरू केले. म्हणूनच ती लवकर बरी होऊन कामावर परतली आहे. मात्र तिने खोटं शौर्य दाखवण्यासाठी सर्वांना खोटं सांगितलं आहे”, असा आरोप रोजलिनने केला आहे.




View this post on Instagram
रोजलिनने हिनावर संधीसाधू अशी टीकासुद्धा केली आहे. “कॅन्सरसाठी 15 तासांची सर्जरी होते. जितकं तिने वाढवून चढवून सांगितलं होतं, तितकं काहीच झालेलं नाही. हिना खानने तिच्या खोटारडेपणासाठी जाहीर माफी मागावी”, अशी मागणी रोजलिनने केली आहे. जून 2024 मध्ये हिनाने तिला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हापासून हिना सोशल मीडियाद्वारे सतत तिच्या उपचाराबद्दलची माहिती देत आहे. त्याचसोबत इतर कॅन्सर पीडितांनाही ती प्रेरणा देतेय. अनेकजण तिच्या धैर्याचं कौतुक करत आहेत. मात्र रोजलिनने तिच्यावर याआधीही आरोप केले आहेत.
“ती तिसऱ्या स्टेजच्या उपचाराविषयी दोन ओळी तरी सांगू शकते का? की तिने फक्त प्रकाशझोतात राहण्यासाठी कॅन्सरचा उपयोग केलाय? गैरसमज पसरवण्यासाठी केलेली ही अत्यंत दयनीय आणि लज्जास्पद कृती आहे. कारण हेडलाइन्समध्ये राहण्यासाठी कॅन्सरचा वापर करणाऱ्या काही जणांना आणि तुला ही गोष्ट माहीत आहे की मेडिकल गैरसमज पसरवण्यासाठी भारतात काही शिक्षा नाही. सोनाली बेंद्रे, लिसा, मनिषा कोईराला यांसारख्या काही सजग अभिनेत्रींनी कधीच इतकी खालची पातळी गाठून लोकांची दिशाभूल केली नव्हती,” अशी पोस्ट तिने याआधी लिहिली होती.