‘रंग दे बसंती’ फेम सिद्धार्थचा ‘टम टम’ गाण्यावर गर्लफ्रेंड अदिती राव हैदरीसोबत डान्स; पहा Video

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांच्या रिलेशनशिपची सध्या जोरदार चर्चा आहे. अदितीच्या वाढदिवशी सिद्धार्थने पहिल्यांदाच तिच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तेव्हापासून चाहते या दोघांना लग्न कधी करणार, असा प्रश्न विचारत आहेत.

'रंग दे बसंती' फेम सिद्धार्थचा 'टम टम' गाण्यावर गर्लफ्रेंड अदिती राव हैदरीसोबत डान्स; पहा Video
Siddharth and Aditi Rao HydariImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 11:13 AM

मुंबई : अभिनेत्री अदिती राव हैदरी गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अदितीचं नाव ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थसोबत जोडलं जातंय. आता या दोघांनी इन्स्टाग्रामवर डान्सचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. सर्वसामान्यांसोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या सेलिब्रिटींनीही सिद्धार्थ-अदितीच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एनिमी’ या तमिळ चित्रपटातील ‘टम टम’ गाणं सध्या इन्स्टाग्रामवर तुफान गाजतंय. याच गाण्यावर सिद्धार्थ आणि अदितीने डान्स केला आहे.

सोशल मीडियावर एखादा नवीन ट्रेंड आला की सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटीसुद्धा त्या ट्रेंडला फॉलो करताना दिसतात. इन्स्टाग्रामवर तुम्ही ‘टम टम’ या गाण्यावर असंख्य रिल्स पाहिले असतील. यावर बरेच बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा थिरकले आहेत. आता आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असलेली जोडी सिद्धार्थ आणि अदितीनेही याच गाण्यावर डान्स करत व्हिडीओ पोस्ट केला आहे. या डान्सच्या व्हिडीओत दोघांमधील हलकी-फुलकी मस्तीसुद्धा पहायला मिळतेय.

हे सुद्धा वाचा

‘डान्स मंकीज- द रिल डील’ असं कॅप्शन देत अदितीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. नेटकरी या दोघांच्या केमिस्ट्रीच्या प्रेमात पडले आहेत. ‘लव्ह लव्ह लव्ह, असेच आणखी व्हिडीओ आम्हाला पहायचे आहेत’, अशी कमेंट अभिनेत्री दिया मिर्झाने केली. तर हंसिका मोटवानीने ‘क्यूट’ असं लिहिलंय. सिद्धार्थ आणि अदितीच्या लग्नाची बातमी लवकरच मिळावी, असेही कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.

अदिती आणि सिद्धार्थ त्यांच्या रिलेशनशिपविषयी अद्याप मोकळेपणे व्यक्त झाले नाहीत. मात्र 2021 मध्ये ‘महा समुद्रम’ या चित्रपटाच्या सेटवर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातंय. गेल्या वर्षी अदितीच्या 36 व्या वाढदिवशी, सिद्धार्थने तिच्यासोबतचा खास फोटो पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ‘हृदयाच्या राजकुमारीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझे सर्व लहान, मोठे आणि न पाहिलेली स्वप्नंसुद्धा पूर्ण होवोत’, अशी पोस्ट त्याने लिहिली होती.

सिद्धार्थचं नाव याआधी बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. समंथा रुथ प्रभू, सोहा अली खान आणि श्रुती हासन यांचंसुद्धा सिद्धार्थसोबत नाव जोडलं गेलं होतं. 2003 मध्ये सिद्धार्थने बालमैत्रीण मेघनाशी लग्न केलं होतं. मात्र 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.