Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prathamesh Laghate | प्रथमेश लघाटेनं 14 किलो वजन कसं घटवलं? सांगितल्या 2 साध्या-सोप्या टिप्स

14 किलो वजन कमी करण्यासाठी प्रथमेशने जिमचाही आधार घेतला नाही. अनेकदा जिममध्ये घाम गाळत व्यायाम करून, ट्रेंडिंग डाएट फॉलो करून सेलिब्रिटी वजन कमी करत असल्याचं पहायला मिळतं. मात्र प्रथमेशने आयुर्वेदाच्या जोरावर हे सहज शक्य करून दाखवलं आहे.

Prathamesh Laghate | प्रथमेश लघाटेनं 14 किलो वजन कसं घटवलं? सांगितल्या 2 साध्या-सोप्या टिप्स
गायक प्रथमेश लघाटेImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 11:24 AM

मुंबई : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांची लव्ह-स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर या जोडीने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. लहानपणी या दोघांना मोदक आणि मॉनिटर या नावाने ओळखलं जायचं. सध्या त्यांच्या प्रेमकहाणीसोबतच प्रथमेशच्या वजन घटवल्याचीही चर्चा होत आहे. त्याने आतापर्यंत 14 किलो वजन कमी केलं आहे. विशेष म्हणजे त्यासाठी त्याने जिमचा आधार अजिबात घेतला नाही. प्रथमेशने आयुर्वेदिक पद्धतीने त्याचं वजन घटवलं आणि हा त्याचा प्रवास अद्याप सुरूच आहे.

प्रथमेश खवय्या आहे हे चाहत्यांना माहीतच आहे. सोशल मीडियावर तो अनेकदा खाद्यपदार्थांचे फोटो पोस्ट करत असतो. खाण्याची प्रचंड आवड असलेल्या प्रथमेशने काही महिन्यांत 14 किलो वजन कमी केलं आहे. यासाठी तो आयुर्वेदानुसार फक्त दोन महत्त्वपूर्ण टिप्स पाळत आहे. प्रथमेशचे हे दोन साधे आणि सोपे टिप्स तुमच्याही कामी येऊ शकतील.

हे सुद्धा वाचा

आयुर्वेदातील दिनश्चर्या आणि ऋतूचर्या या दोन प्रकारांनुसार प्रथमेश त्याच्या डाएटमध्ये बदल करतो. यात सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो मैद्याचे पदार्थ खाणं पूर्णपणे टाळतो. यासोबतच तो रात्री उशिरा जेवणंही टाळतो. अनेकदा त्याचे गायनाचे कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत असतात. मग अशावेळी तो रात्री भरपेट न काता फक्त उपमा किंवा खिचडी खाऊन झोपतो. रात्री उशिरा जेवल्यामुळे आरोग्यावर किती वाईट परिणाम होतो याबद्दल आजवर अनेक आहारतज्ज्ञांनी आणि डॉक्टरांनी सांगितलंच आहे.

14 किलो वजन कमी करण्यासाठी प्रथमेशने जिमचाही आधार घेतला नाही. अनेकदा जिममध्ये घाम गाळत व्यायाम करून, ट्रेंडिंग डाएट फॉलो करून सेलिब्रिटी वजन कमी करत असल्याचं पहायला मिळतं. मात्र प्रथमेशने आयुर्वेदाच्या जोरावर हे सहज शक्य करून दाखवलं आहे. व्यायामाबद्दल तो सांगतो की, “मी कधीच जिमला गेलो नाही. पण पारंपरिक व्यायामाचे प्रकार मी नक्की करतो. सूर्यनमस्कार, दोरीवरच्या उड्या, प्राणायम, चालणं हे सर्व मी करतो. त्याचप्रमाणे माझा भाऊ आयुर्वेदिक डॉक्टर आहे. त्याने सांगितलेला रुटीन डाएट मी फॉलो करतो.”

जवळपास गेल्या चार वर्षांपासून प्रथमेश आणि मुग्धा एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल कुटुंबीयांना कल्पना होतीच. मुग्धाचं शिक्षण पूर्ण झाल्यावर घरी सांगायचं असं त्यांनी ठरवलं होतं. अखेर ठरवून दोघांनी एकाच वेळी आपापल्या कुटुंबीयांना सांगितलं. सारेगमप लिटिल चॅम्प्सपासून सुरु झालेला या दोघांचा प्रवास आता रिलेशनशिपपर्यंत येऊन पोहोचला आहे. आपल्या सुरेल आवाजाने घराघरात पोहोचलेल्या दोन सूरवीरांनी एकमेकांचा पार्टनर म्हणून स्वीकार केला आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.