‘सचिन सर आता शुभमन-साराच लग्नच लावून द्या’, खास फोटो व्हायरल झाल्यामुळे चर्चांना उधाण

'सारा तो जाएगी गिल के साथ...', 'तो' खास फोटो व्हायरल झाल्यामुळे शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचं नातं चर्चेत, फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

'सचिन सर आता शुभमन-साराच लग्नच लावून द्या', खास फोटो व्हायरल झाल्यामुळे चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 11:51 AM

मुंबई : ‘इंडियन प्रीमियर लीग’ २०२३  (IPL) चा अंतिम सामना २८ मे २०२३ रोजी अहमदाबाद येथील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ येथे रंगणार आहे. आयपीएलचा शेवटचा सामना ‘चेन्नई सुपर किंग्स’ आणि ‘गुजरात टायटन्स’ यांच्यात होणार आहे. यावेळी महान क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि युवा फलंदाज शुभमन गिल आमने – सामने दिसणार आहे. त्यमुळे सामन्याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्व आयपीएलच्या शेवटच्या सामन्याची चर्चा रंगत आहे. शुभमन गिल याच्या उत्तम खेळीनंतर आयपीएलची ट्रॉफी कोणता संघ घेवून जाईल… हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने ‘मुंबई इंडियन्स’वर शानदार विजय मिळविल्यानंतर शुभमनचं सर्वत्र कौतुक झालं. दरम्यान शुभमन गिल आणि क्रिकेटचा देवता सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

हे सुद्धा वाचा

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सचिन तेंडुलकर आणि शुभमन गिल कोणत्यातरी विषयावर चर्चा करतना दिसत आहेत. सोशल मीडियावर दोघांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव करत विनोदी अंदाजात शुभमन आणि सारा यांचं लग्न लावून द्या.. असं म्हणत आहे.. सध्या सर्वत्र सारा, सचिन आणि शुभमन यांची चर्चा सुरु आहे..

सचिन आणि शुभमन यांच्या फोटोवर कमेंट करत नेटकरी म्हणाले, ‘सचिन सर आता शुभमन-साराच लग्नच लावून द्या’, दुसरा युजर कमेंट करत म्हणाला, ‘सुनो ससुर जी अब जिद छोडो मान लो मेरी बात, सारा तो जाएगी गिल के साथ…’ तर तिसरा युजर म्हणाला, ‘शुभमन सासरे सचिन यांच्यासोबत लग्नाची चर्चा करत आहे..’ सध्या सर्वत्र सचिन तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या फोटोची चर्चा रंगत आहे.

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, २०२० पासून त्यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. पण १४ फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांच्या नात्याला दुजोरा देण्यात आला. पण सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांनी त्यांच्या नात्याबद्दल अद्याप मौन बाळगलं आहे..

दरम्यान, शुभमन गिल याचं नाव अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण आता दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.. सारा अली खान हिच्यासोबत ब्रेकअप चर्चांनी जोर धरला आहे, तर दुसरीकडे शुभमनचं नाव सारा तेंडुलकर हिच्यासोबत जोडण्यात येत आहे. त्यामुळे नक्की सत्य काय हे अद्याप समोर आलेलं नाही.

मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.