Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar : अर्जुन, साराच शिक्षण किती झालय तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या…

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच्या मुलांबद्दल महत्त्वाची माहिती; किती शिकली आहेत माजी क्रिकेटरची मुलं? सध्या सर्वत्र सारा आणि अर्जुन यांचीच चर्चा...

Sachin Tendulkar : अर्जुन, साराच शिक्षण किती झालय तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या...
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 12:54 PM

मुंबई : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) याच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सोशल मीडियावर देखील सतत सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबाची चर्चा तुफान रंगलेली असते. एवढंच नाही तर, सचिन याची मुलं देखील चाहत्यामध्ये कायम चर्चेचा विषय असतात. सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.सध्या सारा आणि अर्जुन यांच्या शिक्षणाबद्दल चर्चा रगंत आहेत. तर आज जाणून घेवू किती शिकली आहेत, सचिन तेंडुलकर याची दोन मुलं.

सचिन याला दोन मुलं आहेत. दोघेही प्रचंड प्रसिद्ध आहेत. सचिनच्या मोठ्या मुलीचं नाव सारा असून लहान मुलाचं नाव अर्जुन असं आहे. सचिन तेंडुलकर याचा लहान मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अर्जुन याने देखील त्याचं शालेय शिक्षण मुंबई येथील धीरुभाई अंबानी शाळेतून पूर्ण केलं आहे. तर मुंबई युनिव्हरसीटी येथून अर्जुनने पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. अर्जुन त्यांच्या वडिलांप्रमाणे क्रिकेटपटू आहे. फार कमी वयात अर्जुनने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे.

हे सुद्धा वाचा

सारा तेंडुकर हिने शालेय शिक्षण मुंबई येथील धीरुभाई अंबानी शाळेतून पूर्ण केलं आहे. तर साराने तिचं पदवीचं शिक्षण लंडन येथून पूर्ण केलं आहे. साराने युनिव्हरसीटी कॉलेज ऑफ लंडन येथून शिक्षण पूर्ण केलं आहे. साराने वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे. साराने आईप्रमाणे वैद्यकीय विषयात शिक्षण घेतलं आहे.

शिवाय सारा मॉडलिंग देखील करते. तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. सारा कोणत्या क्षेत्रात सक्रिय नसली तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सारा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते.

सारा तेंडुलकर देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर साराने २.५ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर सारा फक्त ५८४ जणांना फॉलो करते. फक्त सोशल मीडियावरच नाही तर, रीयल लाईफमध्ये देखील साराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सारा कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या देखील चर्चा जोर धरत आहेत. पण अद्याप साराने यावर स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. पण साराला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.