‘शीला की जवानी’वर साई पल्लवीचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले ‘कतरिनाही फेल’

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीच्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान हिट ठरतोय. कॉलेज फेस्टमध्ये तिने 'शीला की जवानी' या गाण्यावर डान्स केला होता. त्याचाच हा व्हिडीओ असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

'शीला की जवानी'वर साई पल्लवीचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले 'कतरिनाही फेल'
Sai Pallavi and Katrina KaifImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 11:50 AM

बॉलिवूडमधील काही आयटम साँग तुफान गाजली. या गाण्यांना कितीही वर्षे झाली असली तरी सोशल मीडियावर ती कायम हिट असतात. अभिनेत्री कतरिना कैफचं ‘शीला की जवानी’ हे आयटम साँग अशाचपैकी एक आहे. या गाण्यावर आजवर अनेकांनी परफॉर्म केलं. पण कतरिनाला टक्कर देण्यात कोणाला यश मिळालं नव्हतं. मात्र आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने कतरिनाला तोडीस तोड डान्स केला आहे. तिच्या डान्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून साई पल्लवी आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तीस मार खां’ या चित्रपटातील ‘शीला की जवानी’ या गाण्यावर तिने जबरदस्त डान्स केला आहे.

साई पल्लवी तिच्या सौंदर्यामुळे, अभिनयामुळे आणि डान्समुळे विशेष लोकप्रिय आहे. कोणत्याही मेकअपशिवाय वावरणारी साई तिच्या नैसर्गिक सौंदर्याने अनेकांचं लक्ष वेधलंय. तिने फेअरनेस क्रिमच्या कोट्यवधींच्या जाहिराती धुडकावल्या आहेत. या गोष्टींमुळे चाहत्यांच्या मनात साईविषयी खूप प्रेम आहे. डान्सच्या माध्यमातूनही साई प्रेक्षकांची मनं जिंकते. एका रिअॅलिटी शोमधील तिचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता कॉलेज फेस्टिव्हलमधील साई पल्लवीचा डान्स हिट ठरतोय. कतरिनाच्या प्रसिद्ध ‘शीला की जवानी’ या गाण्यावर ती ज्याप्रकारे थिरकतेय, ते पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

साईने 2008 मध्ये ‘उंगलिल यार अदुथा प्रभू देवा’ नावाच्या एका डान्स रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर 2009 मध्ये ती ‘धी-4’चाही भाग बनली होती. साईला डान्सची खूप आवड आहे. सध्या साई तिच्या आगामी प्रोजेक्टमुळेही चर्चेत आली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. याबद्दल अद्याप तिच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र साईला सीतेच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तर या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.