करिश्मा कपूरसोबत लग्न केलं असतं तर…, सैफ अली खानचं मोठं वक्तव्य, करीना हैराण
Saif Ali Khan: बायकोची बहिणीला सैफ अली खान म्हणाला, 'करिश्मा कपूरसोबत लग्न केलं असतं तर...', करीना कपूर हिच्याकडून मोठं सत्य समोर..., सैफ अली खान - करीना कपूर यांच्यामध्ये कोणत्या कारणामुळे होतात भांडणं? सध्या सर्वत्र सैफ अली खान याच्या वक्तव्याची चर्चा...
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. ‘हम साथ साथ है’ सिनेमातील सैफ – करिश्मा यांची केमेस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली. रिल लाईफमधील दोघांची जोडी रियल लाईफमध्ये पाहाण्यासाठी चाहते उत्सुक होते. पण असं काहीही झालं नाही. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री करीना कपूर हिने मोठा खुलासा केला आहे. सैफ मला कायम म्हणतो बरं झालं करिश्मासोबत लग्न केलं नाही..’ असं म्हणत करीना हिने मजेशीर किस्सा सांगितला आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत करीना कपूर हिने सैफसोबत असलेल्या नात्यावर मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘सैफ आणि माझ्यामध्ये कामय भांडणं होत असतात. भांडणाचा एक विषय असतो ते म्हणजे एसीचं तापमान… मला एसीचं तापमान 20 डिग्री हवं असतं. सैफला प्रचंड गरम होतं त्यामुळे तो कायम 16 वर एसीचं तापमान ठेवतो. भांडणं झाल्यानंतर 19 वर एसीचं तापमान ठेवायचं… असं आमचं ठरतं… एसीमुळे अनेक घटस्फोट देखील झाली आहेत..’
पुढे करीना म्हणाली, ‘पण जेव्हा करिश्मा घरी येते, तेव्हा ती गुपचूप एसीचं तापमान 25 वर ठेवते. सैफ आमच्यासोबत जेवायला बसतो त्याला फार गरम होतं. त्यामुळे सैफ कायम म्हणतो, बरं झालं लोलोसोबत लग्न केलं नाही, बेबोसोबत लग्न केले… कमीत-कमी 19 वर तरी प्रकरण सेटल होतं…’ सांगायचं झालं तर, करीना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असते.
सैफबद्दल काय म्हणाली करीना?
सैफ आणि करीना कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सैफबद्दल करीना म्हणाली, ‘सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यामुळे मी पूर्वीपेक्षा अधिक जबाबदार आणि डाऊन टू अर्थ झाली आहे. आम्ही एकमेकांमध्ये असलेल्या कमतरता पूर्ण करतो. मी त्रासलेली असेल तर, सैफ मला समजवतो. तर सैफ कधी त्रासलेला असेल तर मी त्याची समज काढते…
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सैफ – करीना यांनी लग्न केलं. 2012 मध्ये सैफ – करीना यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाला देखील अनेकांनी विरोध केला. पण दोघांनी फक्त त्यांच्या भावनांना महत्त्व दिलं. लग्नानंतर करीना हिने दोन मुलांना जन्म दिला आहे. सैफ – करीना यांच्या मोठ्या मुलाचं नाव तैमूर अली खान, लहान मुलाचं नाव जेह अली खान… असं आहे.