‘स्वतः पेक्षा लहान, सुंदर महिलांसोबत लग्न…’, अखेर सैफ अली खानने पुरुषांना का दिला असा सल्ला?

अनेक अभिनेत्रींसोबत सौफ अली खान याचं नाव जोडण्यात आलं, अखेर दुसरं लग्न अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत केल्यानंतर अभिनेत्याने इतर पुरुषांना दिला महत्त्वाचा सल्ला

'स्वतः पेक्षा लहान, सुंदर महिलांसोबत लग्न...', अखेर सैफ अली खानने पुरुषांना का दिला असा सल्ला?
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 10:40 AM

Saif Ali Khan On Marrying Younger Women : अभिनेता सैफ अली खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. पण अभिनेता त्याच्या सिनेमांमुळे कमी तर स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चेत असतो. अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडल्यानंतर सैफ आता अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. सैफ आणि करीना यांनी २०१२ साली एकमेकांसोबत लग्न केलं. सैफ आणि करीना यांच्यात १० वर्षांचं अंतर आहे. लग्नानंतर दोघांमध्ये असलेल्या वयाच्या अंतरामुळे सैफ आणि करीनाला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर २०१४ साली जेव्हा अभिनेत्याला विचारण्यात आलं, ‘करीनासोबत लग्न करणं तुझ्या आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट आहे?’ यावर सैफने दिलेलं उत्तर तुफान चर्चेत राहिलं.

तेव्हा सैफने पुरुषांना स्वतः पेक्षा लहान महिलांसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला. अभिनेता म्हणाला, ‘महिलांचं वय लवकर वाढतं आणि त्या पुरुषांपेक्षा अधिक समजदार असतात. महिलांच्या तुलनेच पुरुषांना फार उशीरा समज येते.’ असं म्हणत अभिनेत्याने करीनासोबत लग्न करण्याचा निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर गोष्ट आहे. असं देखील म्हणाला.

करीना आणि सैफ यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘टशन’ सिनेमाच्या सेटवर दोघांमधील प्रेम बहरलं. त्यानंतर अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सैफ आणि करीना यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर जेव्हा सैफला २०१४ साली झालेल्या एका मुलाखतीत विचारलं की, ‘वयात असलेलं अंतर कोणत्या नात्याला प्रभावित करतं..’

हे सुद्धा वाचा

सैफ अली खान या प्रश्नाच्या उत्तर देत म्हणाला, ‘मी सर्व पुरुषांना एकच सल्ला देईल की, स्वतः पेक्षा लहान, सुंदर महिलांसोबत लग्न केलं पाहिजे…’ या वक्तव्यानंतर अभिनेता तुफान चर्चेत आला. करीना आणि सैफ यांनी २०१२ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर सैफ आणि करीना यांना दोन मुलं आहेत. सैफ आणि करीना यांच्या मुलांचं नाव तैमूर अली खान (Taimur Ali Khan) आणि जहांगीर अली खान (Jehangir Ali Khan).

सैफचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत झालं होतं. पण त्यांचं लग्न फार काळ काही टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अमृताबद्दल सांगायचं झालं तर घटस्फोटानंतर अभिनेत्रीने दुसरं लग्न केलं नाही. सिंगल मदर म्हणून अमृताने सारा आणि इब्राहिम यांचा सांभाळ केला.

करीना कपूर नाही तर, 'या' इटालियन मॉडेलमुळे सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट

सैफ याचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंग (Amrita Singh) हिच्यासोबत झालं होत. १९९१ सली सैफ आणि अमृता यांनी लग्न केलं. तेव्हा सैफ फक्त २१ वर्षांचा होता आणि बॉलिवूडमध्ये तेव्हा अभिनेता यशाच्या शिखरावर चढतच होता. तर ३३ वर्षीय अमृता सिंग प्रसिद्ध आणि बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक होती.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.