Saif Ali Khan | सैफ अली खान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, करिनाकडून ‘भूत पोलीस’ चित्रपटाचे पोस्टर शेअर!

सैफ अली खान (Saif Ali Khan), अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम यांनी त्यांच्या आगामी ‘भूत पोलीस’ चित्रपटाचच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

Saif Ali Khan | सैफ अली खान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, करिनाकडून ‘भूत पोलीस’ चित्रपटाचे पोस्टर शेअर!
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 4:39 PM

मुंबई : सैफ अली खान (Saif Ali Khan), अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम यांनी त्यांच्या आगामी ‘भूत पोलीस’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे पोस्टर करिना कपूरसह सगळ्या कलाकारांनी शेअर केले आहे. करिना कपूर नेहमीच सैफ अली खानला सपोर्ट करताना दिसते. त्याचा एखादा नवीन चित्रपट येणार असेल तर, करिना कपूर त्याबाबतच्या विविध पोस्ट सोशल मिडियावर शेअर करत असते. (Saif Ali Khan New Movie Bhoot Police Poster Shares To Kareena Kapoor khan)

‘नया नॉर्मल पैरनॉर्मल है. गुड लक’, असे म्हणत करिना कपूरने ‘भूत पोलीस’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. 2019मध्ये सैफ अली खान, अली फजल आणि फातिमा सना शेख यांच्यासह भूत पोलीस चित्रपटाची घोषणा केली होती. आता अलीकडेच चित्रपटाची कास्ट बदलली आहे. आता अर्जुन कपूर ते सैफ अली खान, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहेत. पहिल्यांदा सैफ, अर्जुन आणि यामी एकत्र काम करणार आहेत. ‘भूत पोलीस’ चित्रपटाची शूटिंग गेल्या काही दिवसांपासुन पुन्हा सुरू झाले आहे. सध्या डलहौजीमध्ये हे शूटिंग सुरू आहे. शूटिंग सुरू झाल्यानंतर चित्रपटाचे डायरेक्टर पवन किरपलानी आणि निर्माते रमेश तोरानी आणि अक्षय पुरी यांचा एक फोटो समोर आला होता. या फोटोमध्ये प्रत्येकाने मास्क घातलेला दिसत होते.

दिग्दर्शक पवन किरपलानी यापूर्वी भूत पोलीस चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले होते. ते म्हणाले, ‘या चित्रपटात आम्ही एडवेंचर-कॉमेडी घेऊन येत आहोत, त्यामुळे आम्ही खूप उत्साही आहोत. सैफ आणि अर्जुन दोघेही चित्रपटात कॉमेडी करणार आहेत. दोघेही चित्रपटात खूप वेगळ्या भूमिकेत असणार आहेत.’ सैफ अली खान शेवट ‘जवानी जानेमन’ या चित्रपटात दिसला होता. याशिवाय सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा ‘दिल बेचार’ या चित्रपटातही सैफची भूमिका होती. सध्या सैफ अली खानकडे बरेच चित्रपट आहेत. भूत पोलीस चित्रपटा व्यतिरिक्त ‘आदिपुरुष’ आणि ‘बंटी आणि बबली 2’मध्ये देखील सैफ अली खान दिसणार आहे.

बॉलिवूडचा नवाब अर्थात अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) त्याच्या लॅविश जीवनशैलीमुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. सैफ अली खानची स्टाईल प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच एक वेगळी छाप पाडत असते. सैफ कायम त्याच्या चाहत्यांशी आणि माध्यमांशी संवाद साधत असतो. अलीकडेच सैफने पतौडी पॅलेसमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत ‘क्वॉलिटी टाईम’ घालवला होता. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी कुटुंबासमवेत तो मुंबईला परतला आहे. त्याने पतौडी पॅलेसचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु, आता सैफ आपल्या कुटुंबासोबत तिथे राहायला जाणार असल्याचे कळते आहे.

संबंधित बातम्या : 

सारानंतर आता सैफ अली खानचा मुलगाही बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीत

‘तान्हाजी’ चित्रपटात दाखवलेल्या इतिहासाशी सहमत नाही : सैफ अली खान

(Saif Ali Khan New Movie Bhoot Police Poster Shares To Kareena Kapoor khan)

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.