व्हिस्कीच्या बाटलीने वार; सैफ अली खानवर नाइट क्लबमध्येही झाला होता हल्ला; कारण धक्कादायक
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीकडून चाकूने हल्ला करण्यात आला. सध्या सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. सैफवर चाकुने हल्ला झालेल्या घटनेमुळे त्याचा जुना किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. सैफवर याआधी एका नाइट क्लबमध्येही हल्ला करण्यात आला होता.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीकडून चाकूने हल्ला करण्यात आला. घरात शिरलेल्या व्यक्तीने सैफ अली खानवर 6 वार केले. सध्या सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे.
सैफच्या जखमा गंभीर
दरम्यान सैफअली खानला झालेल्या जखमा गंभीर असल्याचं म्हटलं जात आहेत. या हल्ल्यात त्याच्या मानेला, डाव्या मनगटाला, छातीला दुखापत झाली आणि चाकूचा एक छोटासा भाग त्याच्या पाठीतून काढण्यात आला होता. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे तातडीनं ऑपरेशन करावं लागल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान सैफ अली खानसोबत याआधीही अशीच धक्कादायत घटना घडली आहे. त्याच्यावर या आधी दोनदा हल्ला झाल्याची घटना घडली होती. याबद्दल स्वत: सैफने सांगितले होते.
सैफ अली खान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, सैफवर चाकुने हल्ला झालेल्या घटनेमुळे त्याचा जुना किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. सैफवर एका नाइट क्लबमध्येही हल्ला करण्यात आला होता. ही घटना दिल्लीच्या नाईट क्लब मध्ये घटना घडली होती.
दिल्लीच्या नाईट क्लब मध्ये झाला होता हल्ला
दिल्लीच्या नाईट क्लब मध्ये सैफवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. नेहा धुपियाचा पॉडकास्ट शो ‘नो फिल्टर नेहा’मध्ये सैफने स्वत: हा किस्सा शेअर केला होता. सैफने सांगितले होते की, “मी दिल्लीतील एका नाईट क्लबमध्ये बसलो होतो आणि तेवढ्यात एक मुलगा माझ्याकडे आला. तो मला म्हणाला, ‘प्लीज माझ्या गर्लफ्रेंडसोबत डान्स कर. मी नकार दिला. मी म्हणालो, मी हे सगळं करत नाही. तर तो म्हणाला, तुझा चेहरा खूप सुंदर आहे. हे ऐकून मला आनंद झाला. मला वाटलं की तो खरंच माझं कौतुक करतोय आणि मी हसलो.”
दोनवेळा झाला होता हल्ला
पुढे सैफ म्हणाला, ” मी नाही म्हटल्यानंतर त्याने माझ्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्याने व्हिस्कीच्या बाटलीने माझ्या डोक्यावरही वार केले. माझ्या डोक्यातून रक्त येऊ लागलं म्हणून मी वॉशरूममध्ये गेलो. तो माझ्या पाठोपाठ वॉशरूममध्ये आला. माझ्या डोक्यातून खूप रक्त निघत होतं म्हणून मी माझ्या डोक्यावर पाणी ओतायला लागलो आणि पाणी ओतताना मी त्या व्यक्तीला म्हणालो की, बघा तू काय केलं ते. तो खूप संतापला होता. त्याने पुन्हा माझ्यावर हल्ला केला. तो वेडा होता. त्याने मला मारून टाकले असतं.” सैफने ही घटना सांगत त्याच्यावर त्या रात्री नाईट क्लबमध्ये दोनदा हल्ला झाल्याचं सैफने सांगितलं .
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान आताही सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने घरात घुसून केलेला हा हल्ला धक्कादायक आहे.तो व्यक्ती आणि सैफमध्ये झटापटही झाली. याच झटापटीमध्ये सैफवर त्याने हल्ला केला. पण या हल्ल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न नक्कीच ऐरणीवर आला आहे.
सेलिब्रिटींची सुरक्षा ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सैफवरील हल्ल्यानंतर त्याच्या घरातील सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. हल्ल्यानंतर पोलिस यंत्रणाही सज्ज झाली असून सैफच्या घरी पोलिस चौकशीसाठी पोहचले आहेत. शिवाय घरातील इतर सदस्य सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं. तसेच करीना कपूरही सैफसोबत रुग्णालयात उपस्थित आहे.