Bollywood : ‘हे’ आहे बॉलिवूडचं सर्वात श्रीमंत कुटुंब, अनेक पिढ्या आरामात रॉयल आयुष्य जगतील

richest family : अफाट संपत्ती आहे बॉलिवूडच्या 'या' कुटुंबाकडे, एकटा मुलगा कमावतो 2 हजार कोटी रुपये... संपूर्ण कुटुंबाची कमाई जाणून व्हाल हैराण... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत कुटुंबाची चर्चा...

Bollywood : 'हे' आहे बॉलिवूडचं सर्वात श्रीमंत कुटुंब, अनेक पिढ्या आरामात रॉयल आयुष्य जगतील
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 8:55 AM

मुंबई | 18 डिसेंबर 2023 : बॉलिवूड सेलिब्रिटी कायम त्यांच्या रॉयल लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. महागडे कपडे, महागड्या गाड्या, आलिशान बंगले… इत्यादी गोष्टींमुळे सेलिब्रिटींची श्रीमंती दिसून येते. अशात कोणतं कुटुंब सर्वात श्रीमंत आहे? अशा चर्चा देखील तुफान रंगलेल्या असतात. बॉलिवूडमध्ये एक कुटुंब असं आहे, जे गेल्या अनेक पिढ्यापासून इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. हे कुटुंब दुसरं तिसरं कोणी नसून खान कुटुंब आहे. सलीम खान यांचा कुटुंब बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. सलीम खान यांनी बॉलिवूडमध्ये लेखक म्हणून करियरची सुरुवात केली आणि झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं. सलीम खान यांच्यानंतर अभिनेता सलमान खान याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. खान कुटुंबाची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.

खान कुटुंब कायम त्यांच्या संपत्तीमुळे देखील चर्चेत असतं. कुटुंबाच्या संपत्तीचा आकडा जाणून तुम्ही हैराण व्हाल. अभिनेता अरबाज खान, अभिनेता सोहेल खान यांच्याकडे देखील गडगंज संपत्ती आहे. पण सलमान खान याच्या कमाईसमोर दोन्ही भावांच्या कमाईचा आकडा फार लहान आहे. तर सलीम खान देखील गडगंज पैसा कमावतात.

सलमान खान याची संपत्ती

खान कुटुंबाच्या संपत्तीच्या पन्नास टक्के मालमत्तेचा एकमेव मालक सलमान खान आहे. रिपोर्टनुसार, सलमान खानची एकूण संपत्ती 2000 कोटी रुपये आहे. एकूण संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर भाईजान याच्याकडे 2916 कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, संपूर्ण कुटुंबाच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, खान कुटुंबाकडे 5259 कोटी रुपये आहेत.

हे सुद्धा वाचा

अरबाज आणि सोहेल खान यांची संपत्ती

नेटवर्थच्या बाबतीत सलमान खानचे दोन भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान त्याच्यापेक्षा खूप मागे आहेत. रिपोर्टनुसार, दोघांच्या मालमत्तेसह त्यांची एकूण संपत्ती 900 कोटी रुपये आहे. यामध्ये अरबाज खानची एकूण संपत्ती 500 कोटी रुपये आहे. सोहेल खानची एकूण संपत्ती 333 कोटी रुपये आहे. वडील सलीम खानही या दोघांपेक्षा पुढे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1000 कोटी रुपये आहे.

सलीम खान त्यांची संपत्ती मुलांमध्ये वाटणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. सलीम खान यांना दोन पत्नी आहे. सलमा खान, हेलन अशी सलीम खान यांच्या दोन पत्नींची नावे आहे. सलीम खान यांचे दोन्ही कुटुंब एकत्र एका घरात राहातात. खान कुटुंबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. खान कुटुंब कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतं.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.