‘ज्या क्षणाची इतक्या वर्षांपासून वाट पाहत होतो, अखेर..’; सलमान – ऐश्वर्याच्या भेटीचा व्हिडीओ तुफान व्हायरल

यामध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या एकत्र कॅमेरासमोर पोझ दिसताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर हे दोघं एकमेकांशी हसत बोलतसुद्धा आहेत. मधेच ऐश्वर्या सलमानच्या कोटचं कॉलर ठीक करते आणि दोघं पुन्हा फोटोसाठी एकत्र पोझ देतात. 

'ज्या क्षणाची इतक्या वर्षांपासून वाट पाहत होतो, अखेर..'; सलमान - ऐश्वर्याच्या भेटीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Salman Khan and Aishwarya Rai (Credit- oyemox)Image Credit source: Instagram/oyemox
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 3:44 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चा काही नवीन नाहीत. आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अफेअरच्या आणि ब्रेकअपच्या चर्चा चवीने चघळल्या गेल्या आहेत. ब्रेकअप करताना यापैकी काहींनी एकमेकांना समजून घेत परस्पर संमतीने मार्ग वेगळे केले. तर काही जोडप्यांचं अफेअर आणि ब्रेकअप या दोन्ही गोष्टींच्या चर्चा कितीही वर्षे झाली तरी पुन्हा नव्याने होऊ लागतात. अशीच एक जोडी म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय. या दोघांचं प्रेमप्रकरण जितकं जगजाहीर होतं, तितकंच त्याचं ब्रेकअपसुद्धा. नात्यात कटुता आल्यानंतर हे दोघं पुन्हा कधीच एकमेकांसमोर आले नाहीत. मात्र या दोघांना कधीही एकत्र पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी मोठा सरप्राईजच असतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला देशविदेशातील सेलिब्रिटींनी अत्यंत ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली होती. तीन दिवसांचा हा भव्यदिव्य कार्यक्रम होता. अंबानींच्या या कार्यक्रमाला जणू अवघं बॉलिवूडच अवतरलं होतं. तर हॉलिवूडचेही नामांकित सेलिब्रिटी त्यानिमित्ताने भारतात आले. याच कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ आहे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा. हे दोघं कधीच एकमेकांसमोर येणार नाहीत, हे चाहत्यांना चांगलंच माहीत आहे. मात्र तरीही असं कधी चुकूनही झालं तरी तो मोठा चर्चेचा विषय ठरतो. कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमातील एका फोटोमध्ये सलमान आणि ऐश्वर्या एकाच फ्रेममध्ये दिसले. त्यानंतर आता त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

यामध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या एकत्र कॅमेरासमोर पोझ दिसताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर हे दोघं एकमेकांशी हसत बोलतसुद्धा आहेत. मधेच ऐश्वर्या सलमानच्या कोटचं कॉलर ठीक करते आणि दोघं पुन्हा फोटोसाठी एकत्र पोझ देतात. इन्स्टाग्रामवरील या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘सूटवाला तो क्षण..’ अशी कमेंट एकाने केली. तर ‘एनएमएसीसी कार्यक्रमातील सर्वोत्कृष्ट क्षण’ असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by M O K S H✨ (@oyemox)

व्हिडीओचं सत्य

सलमान खान आणि ऐश्वर्या रायला असं एकत्र पाहून चाहते खुश होत असेल तरी हा त्यांचा खरा व्हिडीओ नाही. हा एडिट केलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. मात्र हे एडिटिंग इतकं जबरदस्त आहे की खरंच हे दोघंं एकत्र आलेत का, असा प्रश्न चाहत्यांना पडला.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.