पनवेल फार्महाऊसपासून गॅलेक्सी अपार्टमेंटपर्यंत.. सलमानकडे तब्बल एवढी संपत्ती; आकडा ऐकून डोळे विस्फारतील!

जीक्यू इंडियाच्या डिसेंबर 2023 च्या रिपोर्टनुसार, सलमान खानची एकूण संपत्ती जवळपास 3000 कोटी रुपये इतकी आहे. त्याने बिझनेस, स्टार्ट अप्स, रिअल इस्टेट आणि लग्जरी वस्तूंमध्ये गुंतवणूक केली आहे.

पनवेल फार्महाऊसपासून गॅलेक्सी अपार्टमेंटपर्यंत.. सलमानकडे तब्बल एवढी संपत्ती; आकडा ऐकून डोळे विस्फारतील!
Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 10:38 AM

अभिनेता सलमान खानचे केवळ देशभरातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीत आणि चाहत्यांमध्ये ‘भाईजान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमानचा जन्म 27 डिसेंबर 1965 रोजी झाला. त्याने 1988 मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. मात्र 1989 मध्ये ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सलमानने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. यासोबतच त्याने प्रचंड पैसाही कमावला आहे. सलमान हा बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. काही रिपोर्ट्सनुसार, सलमान त्याच्या एका चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रुपयांपर्यंत मानधन स्विकारतो. चित्रपटांशिवाय जाहिराती आणि कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करूनही तो बराच पैसा कमावतो. याशिवाय छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय शो ‘बिग बॉस’चंही तो सूत्रसंचालन करतो. यातूनही त्याची रग्गड कमाई होते.

सलमानची सर्वांत महत्त्वाची संपत्ती म्हणजे वांद्रे इथला आलिशान गॅलेक्सी अपार्टमेंट. डीएनएच्या एका रिपोर्टनुसार, सलमानच्या या सी-फेसिंग ट्रिपलएक्स अपार्टमेंटची किंमत जवळपास 100 कोटींच्या घरात आहे. याशिवाय पनवेलमध्येही सलमानचा सुंदर फार्महाऊस आहे. 150 एकर परिसरात त्याची ही प्रॉपर्टी असून सलमान अनेकदा तिथेच राहणं पसंत करतो. या फार्महाऊसची किंमत जवळपास 80 कोटी रुपये इतकी आहे.

हे सुद्धा वाचा

सलमानला निसर्गाच्या सानिध्यात राहायला फार आवडतं. यासाठी त्याने गोराईच्या समुद्रकिनारी एक घर घेतलंय. या पाच बीएचके बीच हाऊसमध्ये एक जिम, थिएटर, बाइक क्षेत्र आणि स्विमिंग पूलसुद्धा आहे. आपल्या 51 व्या वाढदिवसी त्याने हे घर तब्बल 100 कोटी रुपयांना घेतल्याची माहिती आहे. सलमानला गाड्यांचीही फार आवड आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे. सलमानच्या कार कलेक्शनमध्ये 82 लाखांची मर्सिडीज बेंज एस क्लास, ऑडी A8 L ची किंमत 13 कोटी रुपये, BMW X6 ची किंमत 1.15 कोटी रुपये, टोयोटा लँड क्रूझरची किंमत 1.29 रुपये, ऑडी आरएस 7 ची किंमत 1.4 कोटी रुपये, रेंज रोव्हरची किंमत 2.06 रुपये, ऑडी आर 8 ची किंमत 2.31 कोटी रुपये आणि लेक्सस LX470 ची किंमत 2.32 कोटी रुपये आहे.

सलमान एका यॉटचाही मालक आहे. 2016 मध्ये त्याने आपल्या 50 व्या वाढदिवसानिमित्त ही यॉट विकत घेतली होती. यासाठी त्याने तीन कोटी रुपये मोजले होते. याशिवाय त्याला कपड्यांचा ब्रँडसुद्धा लोकप्रिय आहे. ‘बिईंग ह्युमन’ या ब्रँडचे कपडे, घड्याळं, आभूषणं चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. या ब्रँडचं मूल्य जवळपास 235 कोटी रुपये इतकं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.